

पुणे : गत तीन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस जोरदार बरसत असून मराठवाडा पुन्हा एकदा जलमय करून टाकला. मात्र, तेथील जोर कमी झाला आहे. आता कोकण, विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवार (दि. २२ सप्टेंबर) पर्यंत वाढला असून, मध्य महाराष्ट्रात बुधवारच्या दिवस 'मुसळधारे'चा अंदाज आहे. दरम्यान, परतीचा पाऊस राजस्थान, पंजाब, हरियाणासह गुजरातपर्यंत आला आहे. महाराष्ट्रातून जाण्यास अजून दोन ते तीन दिवस लागतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच, पूर्व राजस्थानसह पंजाब, हरियाणा ही राज्ये काबीज करीत परतीचा मान्सून खाली येण्यास सुरुवात झाली आहे. तो मंगळवारी गुजरातपर्यंत आल्याने महाराष्ट्रात दोन ते तीन दिवसांत येईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी सलग चौथ्या दिवशी तुफान पावसाने हजेरी लावली.
कोकण, विदर्भात २२ पर्यंत मुसळधार
मराठवाड्यातील मोठा पाऊस मंगळवारी कमी झाला. मात्र, मध्यमहाराष्ट्रात बुधवारच्या दिवस मुसळधारेचा अंदाज असून गुरुवारपासून तेथे पाऊस पूर्ण कमी होत आहे. कोकण आणि विदर्भात सोमवार (दि. २२ सप्टेंबर) पर्यंत मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट. ( तारखा )
कोकण : मुसळधार (१७ ते २२)
विदर्भ : अतिमुसळधार (१७), मुसळधार (२० ते २२)
मध्यमहाराष्ट्र : मुसळधार (१७), हलका (१८ ते २२)
मराठवाडा : हलका पाऊस (१७ ते २२)
मंगळवारी झालेला पाऊस ( मि. मी.)
कोकण : पालघर ६७, रामेश्वर ६४, कुडाळ ६३, मालवण ६२, मुल्दे ५८, वसई ४८, पेडणे ४४, फोंडा ४३, सावडे ४३, देवगड ४१, भिरा ४०, कणकवली ३९ मिमी
मध्य महाराष्ट्र : राहुरी ७७, येवला ७३, पाथर्डी ७२, गगनबावडा ५६, श्रीरामपूर ५५, चास ५०, अहिल्यानगर ३३, गडहिंगलज ३३, सांगली ३२, जामनेर ३१ मिमी
मराठवाडा : जालना ११६, हिमायतनगर १०९, पैठण ९२, सोयगाव ९०, कन्नड ७४, वडवणी ६८, खुलताबाद ६०, घनसावंगी ५९, परतूर ५७, गेवराई ५०, अंबड ५०, मांजळगाव ४६, जाफराबाद ४६, बदनापूर ३९, मंठा ३८, हदगाव ३८, लोहा ३४, गंगापूर ३४, वैजापूर ३३ मिमी
विदर्भ : मलकापूर १०८, सिंदखेड राजा ६१, देवळगाव राजा ४९, घाटमाथा : धारावी ५५, ताम्हिणी ४.५, कोयना ४.१, भिरा ४.०.मिमी