

कोकणात काही भागात मुसळधार,
मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम
मराठवाडा, विदर्भात पावसाच्या हलक्या सरी
वादळीवारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस
Rainfall Prediction
पुणे : राज्याच्या सर्वच भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे सर्वच भागात या पावसाने दाणादाण उडवून दिलेली आहे. आता मात्र पावसाची ही दाणादाण थांबणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर पूर्णपणे थांबून लख्ख उन्हे पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. उत्तर तेलंगण ते पूर्व विदर्भ या भागापर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच उत्तर तेलंगण ते विदर्भ दक्षिण महाराष्ट्र पार करून पुढे उत्तर कर्नाटकाच्या अंतर्गत भागापर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला होता.
याबरोबरच मध्यपूर्व अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाली होती. या तीनही स्तिथीचा प्रभाव तीव्र होता. त्यामुळे पावसाने चांगलेच धोबीपछाड करून तो सोडले होते. त्यातच वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटामुळे पावसाने चांगलाच जोर धरला होता. शनिवारी दुपारनंतर सुरू झालेला पाऊस तिस-या दिवशीही (सोमवार ) सुरूच होता. आता मात्र या तीनही स्थितीचा प्रभाव पूर्णपणे कमी झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे 17 किंवा 19 सष्टेंबरनंतर पाऊस पूर्णपणे कमी होणार आहे. मात्र काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात राहील असेही हवामान विभागाच्या अधिका-यांनी सांगितले आहे.
यलो अलर्ट : पालघर (16,17), ठाणे( 16ते 18), मुंबई (16,17), रायगड ( 17 ते 19), रत्नागिरी (16 ते 18), धुळे ( 16 ते 19), नंदुरबार (16 ते 19), जळगाव (16 ते 19), नाशिक ( 16 ते 18), नाशिक घाट ( 16 ते 18), अहिल्यानगर ( 16 ते 19), पुणे (16,17), पुणे घाट (17), सातारा (16), सातारा घाट ( 16,17), सांगली ( 16), सोलापूर (16,17), छत्रपती संभाजीनगर ( 17 ते 19), जालना 16 ते 19), परभणी ( 16,17 ), बीड ( 16), नांदेड ( 16), लातूर ( 16), धाराशिव ( 16,17), अकोला (17), अमरावती ( 16), भंडारा ( 16), बुलढाणा ( 16), चद्रंपूर ( 17), गोंदिया ( 16), नागपूर ( 16), वर्धा ( 16), वाशिम ( 16) ,यवतमाळ (16,17)