

Maharashtra weather forecast next 48 hours
पुणे: रविवारी आणि सोमवारी राज्याच्या बहुतांश भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाट भागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 17 सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार असून, 18 नंतर मात्र पाऊस थांबणार आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढला असून, हवेचा दाबही कमी झाल्याने राज्यात पाऊस पडत आहे.तसेच पूर्व राजस्थानातून मान्सून 15 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करीत आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढला आहे. (Latest Pune News)
राज्याला रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटांना दोन दिवस ’ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट. . . ( तारीख)
ऑरेंज अलर्ट: रायगड (14, 15), रत्नागिरी (15), पुणे घाट (15), सातारा घाट (15)
’यलो अलर्ट’ : पालघर, ठाणे, मुंबई (14, 15), सिंधुदुर्ग (15), नंदुरबार (15, 16), जळगाव, नाशिक, नाशिक घाट (14 ते 17), पुणे शहर (14, 15), कोल्हापूर शहर, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर (14, 15), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड (14 ते 17), हिंगोली, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, भंडारा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, गडचिरोली, वर्धा (14 ते 17)