Maharashtra TET Exam 2026: महाराष्ट्र TET परीक्षा आता 28 जूनला; तारखेत बदल जाहीर

नीट परीक्षेशी टक्कर टाळण्यासाठी निर्णय; परीक्षा परिषदेने नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले
TET Exam
TET ExamPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 21 जूनऐवजी आता 28 जूनला घेण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी अधिकृत पत्रकाद्वारे प्रसिद्ध केला आहे.

TET Exam
Super Woman Syndrome Hypertension: ‘सुपर वुमन’ सिंड्रोममुळे महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढला

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवेत असलेल्या तसेच नव्याने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे 21 जून रोजी नीट परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येत असल्याने दोन्ही परीक्षांसाठी बहुतांश केंद्र समान असल्याचे स्पष्ट झाले.

TET Exam
Pune Jijau ST Bus: पुणे एसटी ताफ्यात 10 नव्या ‘जिजाऊ’ बस; बारामती-नीरा प्रवासाला वेग

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध होण्याबाबत टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार टीईटी पेपर क्रमांक-एक 28 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे, तर पेपर क्रमांक-दोन दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतला जाईल.

TET Exam
Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांमध्ये फक्त 33.95% पाणीसाठा; अल निनोमुळे चिंता वाढली

परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 16 जून ते 28 जून या कालावधीत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी अद्ययावत माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असेही ओक यांनी स्पष्ट केले.

TET Exam
Kedgaon Illegal Fetal Determination Racket: केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत?

टीईटी प्रमाणपत्र 18 मे ते 8 जूनदरम्यान मिळणार

टीईटी 2025 परीक्षेत पात्र उमेदवारांना 18 मे ते 8 जून 2026 या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. महाटीईटी परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यालयाकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news