Pune Jijau ST Bus: पुणे एसटी ताफ्यात 10 नव्या ‘जिजाऊ’ बस; बारामती-नीरा प्रवासाला वेग

सीसीटीव्ही सुविधा आणि 56 आसन व्यवस्था; स्वारगेट-बारामती मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा
Jijau ST Bus
Jijau ST BusPudhari
Published on
Updated on

पुणे: एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात शनिवारी (दि. 16 मे) दुपारी 10 नव्या ‌‘जिजाऊ‌’ बस दाखल झाल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार या बस पुणे मुख्यालयात आल्या असून, यामुळे बारामती आणि नीरा परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पुणे मुख्यालयात आगमन होताच या बसचे तातडीने वाटप करून त्या बारामतीकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

Jijau ST Bus
Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांमध्ये फक्त 33.95% पाणीसाठा; अल निनोमुळे चिंता वाढली

प्रत्येकी 5 बसचे केले वाटप

ताफ्यात दाखल झालेल्या 10 बसचे बारामती डेपो आणि बारामती एमआयडीसी डेपोमध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे समसमान वाटप करण्यात आले आहे.? बारामती डेपोला 5 बस देण्यात आल्या. या बसेस ‌‘बारामती-निरा‌’ मार्गावर धावणार आहेत, तर बारामती एमआयडीसी डेपोला 5 बस देण्यात आल्या.

Jijau ST Bus
Kedgaon Illegal Fetal Determination Racket: केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत?

या बस स्वारगेट-बारामती एमआयडीसी डेपो या मार्गावर प्रवाशांच्या सेवेत तैनात असतील. दोन महिन्यांपूर्वी एक जिजाऊ नावाची बस एसटीच्या पुणे मुख्यालयात आली होती, जी सध्या स्वारगेट-बारामती मार्गावर यशस्वीपणे धावत आहे. आता आणखी 10 बसची भर पडली आहे.

Jijau ST Bus
Shirur MD Drugs Racket: शिरूरमध्ये एमडी ड्रग्स कारखान्याचा कट उघड; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‌‘सीसीटीव्ही‌’ची नजर;‌ ‘3 बाय 2‌’ आसन व्यवस्था

या सर्व बस ‌‘शटल सेवा‌’ म्हणून चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, या बस ‌‘3 बाय 2‌’ आसन व्यवस्थेच्या म्हणजेच 56 सीटर असतील. प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा विचार करून या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Jijau ST Bus
Patas Gas Cylinder Irregularities: पाटसमध्ये गॅस सिलिंडर गैरव्यवहाराच्या तक्रारी; गाव विकासावरही प्रश्नचिन्ह

पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या या 10 नव्या ‌‘जिजाऊ‌’ बसमुळे बारामती आणि स्वारगेट मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. शटल सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि सीसीटीव्हीमुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news