Maharashtra Teacher Recruitment: पवित्र पोर्टलशिवाय शिक्षक भरतीला मान्यता नाही; राज्याचा अध्यादेश

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या शिक्षक नियुक्त्यांचा अहवाल 15 मेपर्यंत सादर करण्याचे आदेश
Teacher Recruitment
Teacher RecruitmentPudhari
Published on
Updated on

पुणे: शिक्षण विभागांतर्गत 22 जून 2017 ते आतापर्यंतच्या राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदावर ‌‘पवित्र‌’ पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्तीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांना कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही, असा अध्यादेशच राज्य शासनाने काढला आहे.

Teacher Recruitment
Pune Municipal Corporation Revenue: पुणे महापालिकेचे विक्रमी उत्पन्न; 9 हजार कोटींचा टप्पा पार

पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या शिक्षकभरतीसंदर्भात न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिका न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. त्यानुसार 22 जून 2017 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक, ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून देण्यात येते. अशा शिक्षकांची जिल्हानिहाय व शाळानिहाय माहिती त्या त्या समित्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून शिक्षण संचालक (माध्यमिक) यांची असेल.

Teacher Recruitment
Pune Property Tax Collection: पुणे महापालिकेला 2985 कोटींचा मिळकतकर; अभय योजनेचा मोठा परिणाम

तसेच 22 जून 2017 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक ज्यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट नाहीत, अशा शिक्षकांची माहिती समितीने संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी. शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वैयक्तिक मान्यतेसाठी प्राप्त झालेली, प्रलंबित असलेली, निकाली निघालेली प्रकरणे विचारात घेण्यात यावीत.

Teacher Recruitment
Pune TDR Approval Process: टीडीआर मंजुरीत वेग; पुण्यात दुसरा टप्पा एका दिवसात पूर्ण

संबंधित समित्यांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती झालेल्या शिक्षकांची जिल्हानिहाय व संस्था, शाळानिहाय माहिती शासनास सादर करावी. समित्यांचे गठन ते शासनास अहवाल सादर करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी दि. 15 मेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या दिनांकास अथवा तत्पूर्वी असा अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी संबंधित समितीची असेल, असे देखील स्पष्ट केले आहे.

Teacher Recruitment
Pune River CCTV Flood Monitoring: पुण्यात पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर CCTV; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

या शिक्षकांना आहे सूट!

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, अनुकंपा नियुक्ती, विनाअनुदानितवरून अनुदानितकडे बदली, कनिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नयन या मार्गांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती होऊ शकते. तसेच काही प्रकरणांत उच्च न्यायालयाने ‌‘पवित्र‌’ पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याबाबत आदेशित केले आहे, अशा शिक्षकांची माहिती अहवालात समाविष्ट करण्यात येऊ नये, असे देखील स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news