Sickle Cell Screening Maharashtra: राज्यात सिकल सेल मोहिमेत 9,700 नवे रुग्ण सापडले

आदिवासीबहुल 21 जिल्ह्यांमध्ये तपासणी; 82 हजारांहून अधिक कॅरिअरचीही ओळख
Sickle Cell
Sickle CellPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील सिकल सेल आजाराचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या जिल्ह्यांमधील रुग्ण शोधण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 9,700 नवे सिकल सेल रुग्ण आणि 82 हजारांहून अधिक सिकल सेल कॅरिअर रुग्णांची ओळख पटली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात आली असली, तरी आजाराचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या 21 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

Sickle Cell
Pune Metro New Route Feasibility: वाकड-कात्रज-शेवाळेवाडी मेट्रो मार्गावर आधी फिजिबिलिटी स्टडी

अरुणोदय विशेष सिकल सेल ॲनिमिया मोहीम 15 जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. अंतिम तारीख 7 फेब्रुवारी असतानाही, मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ती पुढेही सुरू ठेवण्यात आली आहे. या मोहिमेत 0 ते 40 वयोगटातील नागरिकांची तपासणी करण्यावर भर देण्यात आला.

Sickle Cell
Pune Illegal Construction Demolition: पुण्यात अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर

सिकल सेल आजाराचे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि आवश्यक त्या ठिकाणी रेफरल सेवा देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत समाविष्ट असलेल्या आदिवासीबहुल 21 जिल्ह्यांमध्ये ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलडाणा, नांदेड, वाशीम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि हिंगोली यांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान रुग्णांचे निदान सोल्युबिलिटी टेस्टद्वारे करण्यात आले. ही जलद आणि कमी खर्चिक तपासणी पद्धत आहे.

Sickle Cell
Shirur Duplicate Voters Issue: शिरूर तालुक्यात दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर

सिकल सेल ॲनिमियाची स्थिती

सिकल सेल ॲनिमिया असलेल्या रुग्णांमध्ये दोन्ही पालकांकडून दोषयुक्त हिमोग्लोबिन जनुके मुलांमध्ये मिळतात, तर सिकल सेल कॅरिअरमध्ये एक दोषयुक्त आणि एक सामान्य जनुक असते. साधारणतः कॅरिअर व्यक्तींना आजाराची लक्षणे दिसत नाहीत आणि ते सामान्य आयुष्य जगतात. मात्र, तीव्र निर्जलीकरण किंवा उंच प्रदेशात राहणे अशा टोकाच्या परिस्थितींमध्ये क्वचित गुंतागुंत, जसे की प्लीहेला इजा होण्याचा धोका असू शकतो. दोन्ही पालक कॅरिअर असल्यास प्रत्येक गर्भधारणेत 25 टक्केशक्यता सिकल सेल आजारग्रस्त बालकाची, 50 टक्के शक्यता कॅरिअर बालकाची आणि 25 टक्के शक्यता पूर्णपणे सामान्य हिमोग्लोबिन असलेल्या बालकाची असते.

Sickle Cell
Shirur Chakan Karjat Uran Corridor: शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण कॉरिडॉरला सरकारचा हिरवा कंदील

आकडे काय सांगतात..?

16 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या 24 दिवसांच्या कालावधीत राबवली मोहीम 9,725 नवे सिकल सेल रुग्ण आढळले विशेष सिकल सेल मोहिमेत 82,205 सिकल सेल कॅरिअर असलेले रुग्ण आढळले या मोहिमेत 22,145 इतकी संख्या झाली राज्यातील एकूण सिकल सेल रुग्णांची 2,06,480 वर पोहचली आहे राज्यातील कॅरिअर रुग्णांची संख्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news