Maharashtra Teachers Salary Deduction: शाळा बंद आंदोलनात सहभागी ८,६१९ शिक्षकांवर कारवाई; एका दिवसाचे वेतन कापणार

९ जुलैच्या आंदोलनानंतर शिक्षण विभागाचा निर्णय; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कठोर पाऊल
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात ९ जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या ८ हजार ६१९ शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भूमिकेतून शासनाने आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश यापूर्वीच दिले होते.

Money
Maharashtra CET CAP Registration: Engineering, MBA प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा; CET Cell कडून नोंदणीला १६ जुलैपर्यंत मुदतवाढ

९ जुलैच्या आंदोलनापूर्वीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना कोणतीही शाळा बंद राहू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच, शाळा बंद ठेवणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते.

Money
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat: ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात माऊलींची पालखी दिवेघाटाकडे; मार्गभर भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासनाच्या इशाऱ्यानंतरही राज्यातील अनेक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आले. परंतु, या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news