Maharashtra CET CAP Registration: Engineering, MBA प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा; CET Cell कडून नोंदणीला १६ जुलैपर्यंत मुदतवाढ

अभियांत्रिकी आणि MBA/MMS केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया; २.७६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
Maharashtra CET
Maharashtra CET pudhari photo
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी आणि एमबीए, एमएमएस या दोन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस दि. १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिल आणि मे २०२६ मध्ये संपन्न झालेल्या अभियांत्रिकी आणि एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमाची सीईटी दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Maharashtra CET
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat: ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात माऊलींची पालखी दिवेघाटाकडे; मार्गभर भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता अभियांत्रिकी आणि एमबीए, एमएमएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व कागदपत्रांची 'ई-पडताळणी' किंवा 'प्रत्यक्ष पडताळणी' या पद्धती सुरू केल्या आहेत.

Maharashtra CET
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजरात माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेवर

ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यापैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी. 'ई-स्क्रूटिनी' पद्धत निवडल्यास, अर्जाची पडताळणी आणि पुष्टीकरण संबंधित 'ई-स्क्रूटिनी केंद्रा'द्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाईल; त्यामुळे उमेदवाराला यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही.

Maharashtra CET
Sant Tukaram Maharaj Palkhi: पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत तुकोबांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ

मात्र, जर विद्यार्थ्याने 'फिजिकल स्क्रूटिनी' पद्धत निवडली असेल तर जवळच्या स्क्रूटिनी सेंटर किंवा फॅसिलिटेशन सेंटर ला प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी आणि एमबीएस, एमएमएसच्या या अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाची नोंदणी दिनांक २ जुलैपासून सुरू झाली असून, १२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. या दोन अभ्यासक्रमांस मिळून आत्तापर्यंत २ लाख ७६ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Maharashtra CET
Kolwadi Vehicle Theft Case: कोळवाडीत चोरीच्या बलेरोसह चोरट्यांचा थरार! पिस्तूल रोखले, ग्रामस्थांनी दोन जणांना पकडले

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

  • प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे – दि. २ ते १६ जुलै

  • प्रवेशासाठीच्या अर्जाची पडताळणी व निश्चिती. ई-पडताळणी, प्रत्यक्ष छाननी - ३ ते १७ जुलै

  • तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - १९ जुलै

  • सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तक्रारी (असल्यास) सादर करणे - दिनांक २० ते २२ जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २४ जुलै

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news