Maharashtra School Monsoon Safety: मान्सूनमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; धोकादायक वर्गखोल्या तात्काळ बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश

शाळांच्या इमारती, विद्युत यंत्रणा आणि स्वच्छतेची नियमित तपासणी अनिवार्य; सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीच्या सूचना
Maharashtra School Monsoon Safety
Maharashtra School Monsoon SafetyPudhari
Published on
Updated on

पुणे: मान्सून काळात राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी करणे तसेच राज्यातील शाळेतील धोकादायक वर्गखोल्या तत्काळ बंद करा, असे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिले आहेत.

Maharashtra School Monsoon Safety
Tukaram Maharaj Palkhi: ‘तुकाराम महाराज’च्या जयघोषाने नाना पेठ दुमदुमले; पालखी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

शाळेचे छत, भिंती किंवा व्हरांड्यातून पाणी गळत असल्यास त्या भागात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. इमारतीला भेगा, खचणे किंवा इतर संरचनात्मक नुकसान आढळल्यास संबंधित अभियंत्याकडून तपासणी झाल्यानंतरच त्या भागाचा वापर करावा. धोकादायक इमारती किंवा वर्गखोल्या तत्काळ बंद करून परिसराला कुंपण घालावे आणि अतिधोकादायक इमारती नियमानुसार पाडण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश यांनी दिले आहेत.

Maharashtra School Monsoon Safety
Dnyaneshwar Maharaj Palkhi: ‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषाने पुणे दुमदुमले; ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शाळेतील विद्युत यंत्रणा, स्विच, तारा, पंप आणि इतर उपकरणांची सुरक्षितता तपासण्यास सांगण्यात आले असून, वीज कडाडत असताना विद्यार्थ्यांना मैदानात, झाडाखाली किंवा ध्वजस्तंभा जवळ जाण्यास मनाई केली आहे. अतिवृष्टी किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचेही निर्देश आहेत.

Maharashtra School Monsoon Safety
Khadakwasla Dam Construction: खडकवासला धरणाच्या काठावर बांधकामाचा धडाका; पुणेकरांच्या पाणी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

परिसरातील धोकादायक झाडे, तुटलेल्या फांद्या, पडलेले खांब त्वरित हटविणे, पाणी साचू न देणे, गटारे स्वच्छ ठेवणे, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यावरही भर देण्यात आला आहे.

Maharashtra School Monsoon Safety
Dnyaneshwar Maharaj Palkhi Rath: माऊलींच्या नव्या पालखी रथात श्रद्धा अन् आधुनिकतेचा संगम; आळंदी मंदिराच्या शिल्पांची कलाकुसर साकार

तसेच प्रथमोपचार पेटी अद्ययावत ठेवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, विहिरींना मजबूत लोखंडी जाळी बसविणे, संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वाराची पाहणी करणे आणि ज्या शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही तेथे हरित कुंपण उभारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news