

Pune Gangwar Andekar Murder Accused Brother Killed
पुणेः पुण्यातील कोंढव्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आला आहे. गणेश काळे असे खून झालेल्याचे नाव आहे. गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. त्यामुळे या खूनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्यावर्षीय वनराज यांचा गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत खून केला होता. वनराज यांच्या खूनात वापरलेली पिस्तूले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. (Latest Pune News)
आज दुपारी पावने चार वाजताच्या सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात गणेशविसर्जनाच्या पुर्वसंध्येला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीने खून केला होता. त्यानंतर आता समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खून झाला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवार तर भडकले नाही ना असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.