

Maharashtra Rain Alert
पुणेः जुलै महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने सुरू होण्याचा अंदाज असून, मंगळवार ते गुरुवार राज्यातील 29 जिल्ह्यांत पावसाला सुरुवात होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि जूनमध्ये कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यातही पावसाला प्रारंभ होत आहे.
यंदा जूनमध्ये मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पोहोचण्यास कोकण व मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत उ़शीर झाला. परिमाणी, या दोन्ही भागांत कमी पाऊस झाला, मात्र जुलैची सुरुवात चांगली होत असून 29 जिल्ह्यांना दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्टः रायगड (2,3), रत्नागिरी (2,3), सिंधुदुर्ग (2), नाशिक घाटमाथा (3), पुणे घाटमाथा (3,4), कोल्हापूर घाटमाथा (3,4), सातारा घाटमाथा (3,4), चंद्रपूर (4)
पालघर (2, 3), ठाणे (2, 3), मुंबई (2, 3), रायगड (2, 3), रत्नागिरी (2, 3), सिंधुदुर्ग (2), नाशिक घाट (3), पुणे घाट (1, 4), कोल्हापूर (1, 3, 4), छ. संभाजीनगर (2,3), जालना (2,3), परभणी (2), हिंगोली (1,4), नांदेड (2, 4), अकोला (3, 4), अमरावती (1 ते 4 ), भंडारा (1 ते 4), बुलडाणा (3, 4), चंद्रपूर (2,3), गडचिरोली (3, 4), गोंदिया (2, 3, 4), नागपूर (1 ते 4), वाशिम (3,4), यवतमाळ (3,4)