Maharashtra Railway Budget: महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी 23,926 कोटींची तरतूद

2009–14 च्या तुलनेत 20 पट वाढ; 132 स्थानकांचे आधुनिकीकरण, कवच प्रणालीचा विस्तार – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
Bullet Train
Bullet TrainPudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 23,926 कोटी रुपयांच्या (24 हजार कोटी) निधीची तरतूद केली आहे. ही तरतूद 2009-14 च्या सरासरी बजेटच्या (1,171 कोटी) तुलनेत तब्बल 20 पटीने अधिक असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सोमवारी (दि. 02) दिली.

Bullet Train
Samarth Bharat Initiative: समाजाकडे विश्वासाने पाहण्याची गरज; समर्थ भारत ही संधी व आव्हान– डॉ. मोहन भागवत

ते म्हणाले, अमृत भारत स्थानक योजनेसाठी महाराष्ट्रातील 132 स्थानके जागतिक दर्जाची करण्यासाठी निवडली गेली आहेत. या आधुनिकीकरणासाठी 5,675 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. लासलगाव, चिंचपोकळी, परळ आणि आमगाव यासारख्या एकूण 17 स्थानकांचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.

Bullet Train
SSC HSC Exam Staff Transfer Rule: दहावी-बारावी परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत निर्णयात बदल

राज्यात 2014 पासून सुमारे 2,400 कि.मी. नवीन रेल्वेमार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय रेल्वे नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, 3,744 कि.मी. मार्गाचे काम झाले आहे.

Bullet Train
Hadapsar Satavwadi Shiv Sena Victory: हडपसर–सातववाडी प्रभागात शिवसेनेची एकमेव मशाल; नितीन गावडे विजयी

रेल्वेसुरक्षेसाठी ‌‘कवच‌’ या स्वदेशी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. राज्यात 576 कि.मी. मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित असून, 3,617 कि.मी.चे काम प्रगतीपथावर आहे. एकूण 4 हजार 981 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यास मंजुरी मिळाल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.

Bullet Train
CTET Exam Election Duty Relief: सीटीईटी परीक्षा व जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी; 3,474 शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

राज्यात 1,228 उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी राज्यात 1,228 उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी यावेळी नमूद केले की, सध्या राज्यात एकूण 1,70,058 कोटी रुपयांची विविध रेल्वेकामे प्रगतिपथावर आहेत. या प्रचंड गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून, सुरक्षितता आणि वेगवान प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news