Covid 19 Maharashtra: महाराष्ट्रात ३ वर्षांनंतर कोरोनाचा पुन्हा शिरकाव; पुण्यात रुग्णसंख्येत वाढ

आंध्र प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही तब्बल तीन वर्षांनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
Covid 19
Covid 19File Photo
Published on
Updated on

Covid 19 Maharashtra

पुणे: आंध्र प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही तब्बल तीन वर्षांनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या १० दिवसांत पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे ही लक्षणे अत्यंत सौम्य असून, सध्या तरी कोणत्याही नव्या लाटेचे संकेत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

वर्षभरात ४८ रुग्णांची नोंद; मृत्यू शून्य

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात या वर्षात आतापर्यंत ४८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद नाही. गेल्या तीन वर्षांपासून नियंत्रणात असलेला हा विषाणू २०२६ च्या सुरुवातीपासून हळूहळू पसरत असल्याचे समोर आले आहे. जानेवारीत ३, फेब्रुवारीत १, जूनमध्ये ११ तर एकट्या जुलै महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २१ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, नेहमीच्या कोरोना चाचण्यांपेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर आजारांच्या निदानासाठी किंवा शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये हे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.

Covid 19
Lohagad Murder Mistry | चिंता तरुणाईची

कोरोना आता 'इन्फ्लूएंझा'सारखा सामान्य; तज्ज्ञांचे मत

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इन्फ्लूएंझाप्रमाणेच कोविडही आता कायम राहणार आहे. या विषाणूंमध्ये काळानुसार बदल होत असतात, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होताच दर एक-दोन वर्षांनी रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होते. जहांगीर हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. पीयूष चौधरी यांनी 'टाईम्स ऑफ इंडियाला' सांगितले की, "गेल्या ८ ते १० दिवसांत कोरोना आणि इन्फ्लूएंझा या दोन्हीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आमच्या रुग्णालयात ७ ते ८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. जर एका केंद्रात ही संख्या असेल, तर संपूर्ण शहरात अनेक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हा संसर्ग ओमिक्रॉनपेक्षाही सौम्य असून रुग्णांना खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि थकवा अशी ३ ते ५ दिवस राहणारी लक्षणे जाणवत आहेत. सौम्य लक्षणांमुळे अनेक जण चाचण्या करत नसल्याने प्रत्यक्ष संख्या यापेक्षा जास्त असू शकते."

चाचण्यांच्या नव्या पद्धतीमुळे रुग्ण समोर

सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सल्लागार डॉ. सुजाता रेगे यांच्या मते, कोरोना गेल्या काही वर्षांत अधूनमधून येतच होता, पण चाचण्या कमी झाल्याने तो समोर येत नव्हता. सध्या श्वसनाच्या विकारांसाठी प्रगत 'मल्टिप्लेक्स पीसीआर' चाचण्या वापरल्या जात आहेत, ज्यामध्ये एकाच वेळी अनेक विषाणू शोधले जातात. यामुळेच इतर फ्लूच्या रुग्णांसोबत कोरोनाचे रुग्णही समोर येत आहेत. मात्र, ही कोणतीही लाट नसून डेंग्यू, चिकुनगुनिया आणि टायफॉइडसारख्या इतर पावसाळी आजारांसोबतच कोरोनाचे काही तुरळक रुग्ण आढळत आहेत.

ज्युपिटर हॉस्पिटलच्या सल्लागार फुफ्फुसरोगतज्ञ डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांनाही, बऱ्याच काळापासून क्वचितच रुग्ण आढळल्यानंतर, गेल्या काही दिवसांत काही कोविड-पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. "श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या या रुग्णांना ताप आला आणि श्वसनमार्गाच्या विषाणूंसाठी केलेल्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत सर्व प्रकरणे सौम्य आहेत, परंतु पुढील काही आठवड्यांत या ट्रेंडवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे," असे त्या म्हणाल्या.

Covid 19
Nipah virus : केरळमध्ये 'निपाह'चा हाय अलर्ट ..! कोझिकोडमधील रुग्‍णाची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news