Maharashtra Professor Recruitment: राज्यात 5500 प्राध्यापक भरतीला मंजुरी, ग्रंथपालाची रिक्त पदेही भरणार

librarian post vacancy 2026: ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांसह रोस्टर तपासणी सुरू
professor recruitment 2026
professorPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील विविध विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक यांची रिक्त पदेही भरावीत, या संदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांबरोबरच शिक्षण संस्थांना या दोन पदांची रोस्टर तपासणी करावी लागणार आहे.

professor recruitment 2026
PMC Drainage Scam: पुणे महापालिकेकडून ठेकेदाराला वाचवण्यासाठी खोटी माहिती

राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील साडेपाच हजार प्राध्यापकांची पदे पुढील काळात भरली जाणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित ही पदे भरली जातील. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विषयनिहाय पदांचा तपशील कळविण्यात आला आहे. परिणामी आता महाविद्यालयाकडून रोस्टर तपासणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण होणे अपेक्षित आहे.

professor recruitment 2026
Adoshi Tunnel: बोरघाटातील आडोशी बोगद्याचे मजबुतीकरण सुरू होणार

शासनाने सहाय्यक प्राध्यापक पदांबरोबरच ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदभरतीस मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या तिन्ही संवर्गाची एकत्रित बिंदू नामावली अर्थात रोस्टर तपासणी करून घ्यावी लागणार आहे. या तिन्ही संवर्गाच्या एकत्रित बिंदू नामावलीचे आरक्षण निश्चित करताना मागासवर्ग कक्षाकडून या तिन्ही संवर्गातील एकत्रित रिक्त पदांचे आरक्षण आणि प्रत्यक्ष भरावयास शासनाने मान्यता दिलेल्या पदांचे आरक्षण स्वतंत्ररीत्या दर्शविले जाते. प्रत्यक्षात भरावयाच्या पदांचे आरक्षण निश्चित करताना शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयाचा विचार प्रत्यक्ष भरावयाच्या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करताना करणे आवश्यक आहे.

professor recruitment 2026
Pune Crop Loan: पुणे जिल्हा बँकेकडून खरीपासाठी 2500 कोटींचे पीक कर्ज नियोजन

पुणे विभागीय उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या पदांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

professor recruitment 2026
Bhor CNG Pipeline Issue: पुणे-सातारा महामार्गावर गॅस पाइपलाइनमुळे वाद

1 ऑक्टोबर 2025 रोजी मंजूर भरलेल्या व रिक्त असलेल्या ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे रोस्टर तपासणीत शैक्षणिक संस्थांना कोणतीही अडचण येणार नाही. बिंदू नामावली पूर्ण झाल्यानंतरच रिक्त जागांचा अधिकृत तपशील समोर येणार असून, त्यानुसार भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news