Pune Crop Loan: पुणे जिल्हा बँकेकडून खरीपासाठी 2500 कोटींचे पीक कर्ज नियोजन

पिकांच्या कर्जमर्यादेत वाढ; शेतकऱ्यांना वेळेवर निधी मिळण्यावर भर
Pune District Cooperative Bank
Pune District Cooperative BankPudhari
Published on
Updated on

किशोर बरकाले

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) मागील दोन-तीन वर्षे केलेल्या पीक कर्जवाटपाची आकडेवारी लक्षात घेऊन प्राथमिकृदृष्ट्‌‍या यंदाचे आर्थिक वर्ष 2026-27 च्या खरीप हंगामाकरिता सुमारे अडीच हजार कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे नियोजन निश्चित केले आहे. त्यादृष्टीने येत्या सोमवारपासून (दि.6) क्षेत्रीय स्तरावरील बँकेच्या शाखांमधून गावच्या विकास सोसायट्यांमार्फत शेतकरी सभासदांना पीक कर्जवाटपास वेग येण्याची अपेक्षा आहे. बहुतांशी पिकांच्या कर्जमर्यादा रकमेत वाढ करण्यात आली आहे.

Pune District Cooperative Bank
Bhor CNG Pipeline Issue: पुणे-सातारा महामार्गावर गॅस पाइपलाइनमुळे वाद

पीडीसीसी बँकेस गतवर्ष 2025-26 रोजी बँकेस खरिपात 2064 कोटींइतके उद्दिष्ट जिल्हास्तरीय समितीने दिले होते. तर, जिल्हा बँकेने उद्दिष्टांपेक्षा अधिक म्हणजे 2 हजार 490 कोटींइतके (120 टक्के) पीक कर्ज वितरण करून आपले अग््रास्थान आणखी बळकट केले आहे. जिल्हा बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्राथमिक शेती सहकारी संस्थांकडून (विकास सोसायटी) त्यांच्या शेतकरी सभासदांकरिता सन 2026-27 हंगामाकरिता प्रचलित नवीन बँक धोरणाप्रमाणे अल्पमुदत पीककर्ज मागणीपत्रक (कमाल कर्ज मर्यादा पत्रके) दाखल करून घेण्याबाबतच्या परिपत्रकीय सूचना सर्वच शाखांना दिलेल्या आहेत.

Pune District Cooperative Bank
Talwade Road Safety: तळवडे घाट रस्त्यावर अपघाताचा धोका

त्यामध्ये सर्व ऊसासाठी प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांनी कर्जमर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामध्ये आडसाली उसाला प्रति हेक्टरी 1 लाख 80 हजार रुपये, पूर्व हंगामी व सुरू उसासाठी प्रत्येकी 1 लाख 70 हजार रुपये, तर खोडवा उसासाठी 1 लाख 65 हजार रुपयांची कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भात, स्वीटकॉर्न मका, जिरायत बाजरी, टोमॅटोची प्रतिहेक्टरी कर्जमर्यादा प्रत्येकी पाच हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. सर्वाधिक कर्जमर्यादा वाढ ही हळद पिकात असून, ती 15 हजार रुपयांची आहे.

Pune District Cooperative Bank
Yerawada Mental Hospital: येरवडा मनोरुग्णालयात रुग्णांची हेळसांड

तर, सोयाबीन, हिरवी मिरची व लसूण प्रत्येकी 10 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. खरिपातील प्रमुख पीकनिहाय प्रतिहेक्टरी कर्जमर्यादा रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भात 85000, सोयाबीन 75000, सूर्यफूल 45000, तीळ 36000, स्वीटकॉर्न मका 55000, खरीप ज्वारी 50000, बाजरी सुधारित 43000, बाजरी जिरायत 40000, कांदा खरीप 115000, बटाटा 115000, टोमॅटो 115000, हिरवी मिरची 110000, लसूण 80000, हळद 165000, आले 140000.

Pune District Cooperative Bank
Video Conferencing Divorce: पुण्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तीन तारखांत घटस्फोट मंजूर

पुणे जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांहून जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज वाटप पीडीसीसी बँकेकडून केले जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदी निविष्ठांच्या खरेदीसाठी वेळेवर मिळणाऱ्या पीककर्जाचा फायदा होतो. तसेच बँकेद्वारे पीककर्ज वाटपाचे सुयोग्य नियोजन करून खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यंदाचे जिल्हास्तरीय आर्थिक नियोजन समितीकडून यंदाचे उद्दिष्ट लवकरच मिळेल. तरीसुद्धा आम्ही प्राथमिकदृष्ट्‌‍या सुमारे अडीच हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे नियोजन आम्ही निश्चित केले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून अधिक मागणी आल्यास जादा पीककर्ज वाटप करण्याचेही नियोजन संचालक मंडळाने केले आहे.

प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news