Bhor CNG Pipeline Issue: पुणे-सातारा महामार्गावर गॅस पाइपलाइनमुळे वाद

सेवा रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा; भविष्यात वाहतूक कोंडीचा धोका
Bhor CNG Pipeline
Bhor CNG PipelinePudhari
Published on
Updated on

वैभव धाडवे पाटील

सारोळा: पुणे-सातारा महामार्गावर आधीच अनेक कामे अर्धवट असताना, आता सेवा रस्त्याला (सर्व्हिस रोड) लागूनच टाकली जाणारी गॅस पाइपलाइन महामार्गाच्या भविष्यासाठी मोठी अडचण ठरणार आहे. या पाइपलाइनमुळे भविष्यात सेवा रस्त्यांचे तिपदरीकरण आणि पावसाळी गटारांची कामे करणे अशक्य होणार असून, महामार्ग प्रशासनाच्या या धोरणामुळे प्रवाशांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे.

Bhor CNG Pipeline
Talwade Road Safety: तळवडे घाट रस्त्यावर अपघाताचा धोका

पुणे शहराचे 50 किलोमीटरपर्यंत झालेले विस्तारीकरण, रिंगरोडचे काम, प्रस्तावित मेट्रो लाईन आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाढती लोकसंख्या पाहता या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे.

सद्य:स्थितीत नऱ्हे-आंबेगाव परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे; मात्र सेवा रस्त्यालगत आधीच पाणीपुरवठा, टेलिफोन आणि वीज वाहिन्यांचे जाळे असल्याने प्रशासनाकडे जागा शिल्लक नाही. त्यातच आता गॅस पाइपलाइनची भर पडत आहे.

Bhor CNG Pipeline
Yerawada Mental Hospital: येरवडा मनोरुग्णालयात रुग्णांची हेळसांड

वास्तविक, महामार्ग प्राधिकरणाकडे संपादनानंतर काही फूट जागा शिल्लक आहे. नियमानुसार पाइपलाइन सेवा रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर असणे गरजेचे आहे. परंतु, प्राधिकरणाचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. जर, आताच ही पाइपलाइन योग्य ठिकाणी स्थलांतरित केली नाही, तर भविष्यात विस्तारीकरणासाठी या वाहिन्या शिफ्ट करणे प्रशासनाला डोकेदुखी ठरेल.

Bhor CNG Pipeline
Video Conferencing Divorce: पुण्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तीन तारखांत घटस्फोट मंजूर

नियम धाब्यावर; दंडात्मक कारवाईची मागणी

वाहतूक मंत्रालय (चजठढक) आणि पेट्रोलियम नियामक मंडळाच्या नियमावलीला हरताळ फासून टोरेंट गॅस कंपनीचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने सुरू असलेली ही नियमांची पायमल्ली थांबवून, संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी आणि महामार्ग सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

Bhor CNG Pipeline
Pune Hadapsar Road Widening: हडपसर टर्मिनल रस्त्याच्या रुंदीकरणाला गती

कोंडीला नियोजनशून्य कारभार कारणीभूत

अर्धवट कामे, सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे आणि तांत्रिक चुकांमुळे कापूरव्होळ, किकवी यांसारख्या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आता टाकली जाणारी गॅस पाइपलाइन भविष्यातील विकासकामांत मोठा अडथळा ठरणार आहे. ही वेळ गॅस पाइपलाइनचे काम थांबवून ती योग्य ठिकाणी हलवण्याची आहे, अन्यथा महामार्ग कायमस्वरूपी कोंडीत अडकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news