Maharashtra Kesari 2026: पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेची धूम; सुनेत्रा पवार यांचे मल्लांना मार्गदर्शन

68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन; कुस्ती परंपरा जपण्याचे आवाहन, महापौर उशिरा पोहोचल्याची चर्चा
Maharashtra Kesari 2026
Maharashtra Kesari 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. याच कुस्तीने देशाला पहिले पदक मिळवून दिले. कुस्तीचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचे काम सर्वांनी करायचे आहे. अशा स्पर्धेतून अनेक मल्ल घडले आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दादांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. विशेषतः त्यांचे कुस्तीवर विशेष प्रेम होते. क्रीडा क्षेत्राला वेगळी झळाळी दादांनी मिळवून दिली होती. मल्ल हा शिस्त आणि प्रामाणिक असतो.

Maharashtra Kesari 2026
Onion Price Crash Maharashtra: वाल्ह्यात कांद्याचे दर कोसळले; शेतकरी आर्थिक संकटात

स्पर्धेच्या आखाड्यात मल्लांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक रामकृष्ण सातव पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव संजय शेटे, आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रदीप कंद, मोनिका मोहोळ, प्रियांका सातव, ऑलिम्पियन मारुती आडकर यांसह विविध महाराष्ट्र केसरी विजेते, मल्ल उपस्थित होते.

Maharashtra Kesari 2026
Shirur Crime: शिरुर तालुक्यात 12 वर्षीय मुलाचा खून; 21 महिन्यांपूर्वीच्या घटनेशी साम्य

यावेळी साक्षी इंगळे या खेळाडूचा सन्मान करण्यात आला. सातव म्हणाले, या स्पर्धेत नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली असून, मातृशक्तीला मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी महिला फारशा येत नाहीत. परंतु, त्यांना या कुस्त्या पाहता याव्यात म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र गॅलरी ठेवली आहे. त्यातून नवीन मल्ल कुस्तीला मिळतील. कुस्तीचा आवाका वाढवा तसेच गॅल्यामर मिळावे, या हेतूने हे आयोजन केले आहे. तडस म्हणाले, या स्पर्धेतून विजेता स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतो हा इतिहास आहे. महाराष्ट्र केसरी ही एकच होणार असून बाकीच्या स्पर्धा अनधिकृत आहेत. कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पदक मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

Maharashtra Kesari 2026
Unseasonal Rain Impact Farmers: जुन्नरमध्ये अवकाळी पावसाचे सावट; कांदा-गहू काढणीवर संकट

महाराष्ट्र केसरी कुस्तीवर फक्त अवलंबून राहू नका, तर महाराष्ट्राच्या मल्लाने राष्ट्रीय, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेच्या माध्यमातून ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावे. स्व. अजित पवारांनी क्रीडा क्षेत्राला पुढे आणण्याचे आणि या विभागाला सुगीचे दिवस आणण्याचे काम केले आहे. नागपुरे म्हणाल्या, आजचा सोहळा महिलांच्या सन्मानाचा आहे. महाराष्ट्र केसरी कुस्तीची परंपरा आजही जपत आहोत. केवळ स्पर्धा नसून खेळाडूंचा शक्तीचा ही आदर आहे. त्याचबरोबर इतर स्पर्धा आयोजित करून तरुणाईला आकर्षिक करण्याचा चांगला उपक्रम घेतला आहे. यावेळी प्रदीप कंद, ज्ञानेश्वर कटके यांनी ही मनोगत व्यक्त केले. रामभाऊ दाभाडे यांनी आभार मानले.

Maharashtra Kesari 2026
Pune MASAP Election Controversy: ‘मसाप’ निवडणुकीवर राजकीय सावट? देशमुखांचे सोमणांना सवाल

महापौरांना नाही वेळेचे भान...

पुण्यासारख्या शहरात भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उ‌द्घाटनाला पुणे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर मंजुषा नागपुरे यांनी सायंकाळी ७ वाजता उपस्थित राहणे अपेक्षित होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार वेळेच्या १५ मिनिटांपूर्वी मैदानावर उपस्थित होत्या. पाच वर्षानंतर पुणे शहराला महापौर मिळाला असूनही तब्बल ४५ मिनिटे उशिरा महापौर उद्घाटनाला पोहोचले. त्यांच्या उशिरा येण्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news