Shirur Crime: शिरुर तालुक्यात 12 वर्षीय मुलाचा खून; 21 महिन्यांपूर्वीच्या घटनेशी साम्य

साईराज मांजरे प्रकरणात आरोपी अटकेत; यश गायकवाड प्रकरणाचा पुन्हा उजाळा, नागरिकांचे आंदोलन
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे: दहिवडी (ता. शिरूर) येथील मांजरेवस्ती येथे 12 वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) घडली. साईराज गणेश मांजरे असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी अक्षय दत्तात्रय मांजरे (वय 22, रा. मांजरेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर) याला अटक केली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत गणेश जयसिंग मांजरे (वय 38, रा. मांजरेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

Murder Case
Unseasonal Rain Impact Farmers: जुन्नरमध्ये अवकाळी पावसाचे सावट; कांदा-गहू काढणीवर संकट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिवडी (ता. शिरूर) येथील साईराज गणेश मांजरे हा 12 वर्षीय बालक मंगळवारी (दि. 17) दुपारी घरातून गेला. मात्र, पुन्हा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर साईराजचा मृतदेह मिळाला. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी यश गायकवाडचा देखील अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता व त्याचे कारण समोर आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Murder Case
Pune MASAP Election Controversy: ‘मसाप’ निवडणुकीवर राजकीय सावट? देशमुखांचे सोमणांना सवाल

दरम्यान, पोलिसांनी ही घटना वन विभागाच्या माथी मारल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून, या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद करा, तेव्हाच आम्ही मृतदेह हलवू, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी स्थानिकांचा रोष लक्षात घेत घटनास्थळीच फिर्याद घेत अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिक्रापूर पोलिस घटनेचा तपास करीत असताना पोलिसांना संशयित अक्षय मांजरे याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर व पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अक्षय दत्तात्रय मांजरे याला अटक केली आहे.

Murder Case
Pune Vehicle Sales Gudipadwa: गुढीपाडव्याला पुणेकरांची वाहन खरेदीत विक्रमी उसळी

...तर यशला देखील मिळाला असता न्याय

दहिवडी येथील साईराज मांजरे याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्रापूर पोलिसांनी घटनेचा छडा लावला. त्याचप्रकारे 21 महिन्यांपूर्वी यश गायकवाडच्या प्रकरणाचे तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला असता, तर यश गायकवाडला देखील न्याय मिळाला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Murder Case
Pune Construction Debris Dumping: पुण्यात राडारोडा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; महापालिकेचा कडक इशारा

नागरिकांचे ठिय्या आंदोलन

दहिवडी येथील यश गायकवाड व साईराज मांजरे या दोघांचे मृतदेह एकाच ठिकाणी, एकाच विहिरीजवळ, एकाच ठरावीक वेळेत, तर दोघांच्याही डोळ्यालाच जखम, अशा अवस्थेत मिळून आले. यश गायकवाडचा मृतदेह बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे बोलले गेले. मात्र, तसा अहवाल प्राप्त झाला नाही. आज देखील बिबटहल्ल्याचा संशय व्यक्त केला जात असताना स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत हा गुन्हा वन विभागात घेऊच नका, अशी मागणी करीत ठिय्या मांडला होता.

तब्बल 21 महिन्यांपूर्वीच्या घटनेला उजाळा

विशेष म्हणजे, 21 महिन्यांपूर्वी 21 जून 2024 रोजी यश गायकवाड या बालकाचा डोक्यावर जखम असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला असताना त्याच ठिकाणी त्याच शेतात व त्याच विहिरीच्या कडेला त्याच पद्धतीने डोक्यावर जखम असलेल्या अवस्थेत खून झालेल्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news