Maharashtra Innovation Council Lab: राज्यातील महाविद्यालयांत ‘इनोव्हेशन कौन्सिल लॅब’ सुरू होणार; डॉ. शैलेंद्र देवळाणकरांची घोषणा

इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0 मध्ये मोठी घोषणा; ११३२ महाविद्यालयांत लॅब उभारण्याची तयारी
Maharashtra Innovation Council Lab
Maharashtra Innovation Council LabPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावे, यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केली.

Maharashtra Innovation Council Lab
Maharashtra Kesari Wrestling: वाघोलीत ६८वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा

इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‌‘इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0‌’च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. देवळाणकर बोलत होते. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, टेकॅथॉन 2.0 चे विजेते गणेश खोसे, तेजस यादव, प्रा. देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडगे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओव्हाळ आदी उपस्थित होते. यंदाच्या ‌‘इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0‌’मध्ये 450 संघांचे 1700 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून, ते पुढील 24 तास नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहेत.

Maharashtra Innovation Council Lab
Purandar Lift Irrigation Water Pollution: पुरंदर उपसा योजनेचे दूषित पाणी; आरोग्यावर गंभीर परिणाम

डॉ. देवळाणकर म्हणाले, आम्ही शिकताना अशा पद्धतीचे व्यासपीठ नव्हते. त्यामुळे आमच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना पुढे नेता आले नाही. इनोव्हेशन फाउंडेशनचा टेकॅथॉन हा उपक्रम विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. यातून समाजाभिमुख संशोधन आणि संशोधक घडत आहे. ही चळवळ अशीच पुढे जाण्याची गरज आहे. टेकॅथॉन किंवा हॅकेथॉनसारख्या उपक्रमांमध्ये मुख्यत्वे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सहभागी होतात. मात्र, पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कमी संधी मिळते. ही दरी भरून काढण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्यातच आता पुढे जात राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅब सुरू करण्याची प्रक्रिया लवकरच कार्यान्वित होईल. उच्च शिक्षण संचालनाअंतर्गत असणाऱ्या 1132 अनुदानित महाविद्यालयांमध्ये अशा लॅबची निर्मिती होईल आणि त्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयात अशा निर्माण करण्यासाठी मदत करण्यात येईल.

Maharashtra Innovation Council Lab
Rahu Daund Sugarcane Rate: राहू बेट परिसरात उसाला विक्रमी दर; गुऱ्हाळ घरांवर ३९०० रुपये प्रतिटन

यादव म्हणाले की, पहिल्या इनोव्हेट यू टेकॅथॉनमध्ये विविध राज्यांतील 230 संघ सहभागी झाले होते. आज हा प्रवास 450 संगणकापर्यंत येऊन पोहचला आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासोबतच ते सोडविण्याचे काम आम्ही करतो. त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कशी विकसित होईल, याचाही विचार करणे गरजेचे आहे. ते अधिकाधिक लोकांना नोकरी देणारे कसे होतील? यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. ही केवळ स्पर्धा नसून या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधक आणि उद्योजक घडविण्याचा उद्देश आहे, असे सांगितले.

डॉ. माने म्हणाले की, टेकॅथॉन 3.0 ही राज्यातील क्रमांक एकची स्पर्धा असून, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन सहभागी झाले आहे. आपल्याला विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास न्यायचे असेल, तर त्यासाठी सामाजिक समस्या सोडविणारे संशोधक हवे आहेत. या स्पर्धेतून विकसित भारताची संकल्पना होण्यास हातभार लागणार आहे. बालुशा माने यांनी सूत्रसंचालन केले.

Maharashtra Innovation Council Lab
Baramati House Break Theft Arrest: बारामतीतील सूर्यनगरीत घरफोडी; सोन्या-दागिन्यांसह रोख रक्कम चोरी, दोघे अटकेत

‌‘इनोव्हेट यू टेकॅथॉन‌’ हा उपक्रम राज्यपातळीवर...

‌‘इनोव्हेट यू टेकॅथॉन‌’ हा उपक्रम राज्यपातळीवर नेण्याची गरज आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विभागीय स्तरावर अशा पद्धतीची स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून निवडलेल्या चांगल्या संकल्पना आणि विजेत्यांना पुण्यात बोलावून सादरीकरणाची संधी मिळेल. त्यासाठी उच्च व त्यांचे शिक्षण विभागाचे इनोव्हेशन फाउंडेशनला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news