Maharashtra Kesari Wrestling: वाघोलीत ६८वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा
वाघोली: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आणि रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन यांच्या सहकार्याने 68वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे होणार आहे. वाघोलीतील ग््राामस्थांच्या आग््राहास्तव ही मानाची स्पर्धा मुख्य गावातील बाजारतळ मैदानावर आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाघोली ग््राामस्थांची बैठक शुक्रवारी (दि. 20 फेबुवारी) पार पडली. या बैठकीत स्पर्धा भव्य आणि यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना, जबाबदाऱ्यांचे वाटप, नियोजनाची रूपरेषा तसेच आवश्यक सुविधा व व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बाजारतळ मैदानावर उभारण्यात येणाऱ्या कुस्ती मैदानाचा आराखडा, प्रेक्षकव्यवस्था, पार्किंग तसेच इतर आवश्यक सोयीसुविधांचे प्राथमिक सादरीकरण या वेळी करण्यात आले. उपस्थितांनी नियोजनासंदर्भात आपले अभिप्राय व सूचना मांडत स्पर्धा अधिक दर्जेदार करण्यासाठी सूचना दिल्या.
ही स्पर्धा वाघोलीकरांसाठी ऐतिहासिक ठरणार असून, गावच्या नावलौकिकात भर घालण्याची संधी असल्याची भावना बैठकीत व्यक्त झाली. ‘वाघोलीकरांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडू,’ असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. बैठकीस विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्किंगचे विशेष नियोजन करणार
राज्यभरातून येणाऱ्या कुस्तीप्रेमींच्या वाहनांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. महामार्गालगत असणाऱ्या शाळा, शासकीय मोकळ्या जागा तसेच ग््राामस्थांच्या खासगी मोकळ्या जागांवर वाहनतळाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे स्पर्धा काळात वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

