Maharashtra HSC SSC Exam 2026: दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यंदा ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आले आहे.
Maharashtra HSC SSC Exam 2026
दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर(Pudhari Photo)
Published on
Updated on

Maharashtra Board Exam Updates

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यंदा ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल, तर दहावीच्या परीक्षेसाठी 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. परंतु, यंदा दोन महिने उशिरा म्हणजेच 13 ऑक्टोबरला दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra HSC SSC Exam 2026
Pulse Polio Campaign Pune: पुण्यात दोन लाख 62 हजार बालकांना ‌‘दोन बुंद जिंदगी के‌’

बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाइन निकाल मेअखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधारअंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत: जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापासून घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन 2026 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करून यंदा 18 मार्चपर्यंत दोन्ही परीक्षांचा शेवट करण्याचा मंडळाचा मानस असून, त्यानुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक...

बारावीची लेखी परीक्षा

- 10 फेब्रुवारी ते 18 मार्च

श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन

-23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी

Maharashtra HSC SSC Exam 2026
SSC: एसएससीच्या 20 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावीची लेखी परीक्षा

-20 फेब्रुवारी ते 18 मार्च

श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन

-२ फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news