

पुणे: स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीने 2025-26 या सत्रात होणार्या भरतीसाठी सुधारित वार्षिक वेळापत्रक जाहीर केले आहे. संबंधित वेळापत्रक एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यामध्ये एकूण 20 भरतींच्या तारखा देण्यात आल्या आहेत. एसएससी भरतीच्या परीक्षेची तयारी करणारे सर्व उमेदवार सर्व रिक्त पदांची तारीखवार माहिती तपासू शकतात.
एसएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, एनआयए, एसएसएफ आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी भरती परीक्षा, एसएससी, सीजीएल दिल्ली पोलिस, सीएचएसएल कनिष्ठ अभियंता आणि एमटीएस हवालदार आदी तब्बल 20 भरतींसाठी संभाव्य तारखांची माहिती देण्यात आली आहे. (Latest Pune News)
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, एनआयए, कनिष्ठ अभियंता पदांचा समावेश
जेएएसए/एलडीसी ग्रेड मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, 2024 (फक्त डीओपीटीसाठी) - 8 जून 2025
एसएसए/यूडीसी ग्रेड मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, 2024 (फक्त डीओपीटीसाठी) -8 जून 2025
एएसओ ग्रेड मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, 2022-2024 -8 जून 2025
निवड पद परीक्षा टप्पा बारावा, 2025 2 ते 23 जून 2025 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025
एसएससी सीजीएल परीक्षा, 9 जून ते 4 जुलै 2025, 13 ते 30 ऑगस्ट 2025
संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 23 जून ते 18 जुलै 2025 8 ते 18 सप्टेंबर 2025
एसएससी एमटीएस (नॉन-टेक्निकल) कर्मचारी आणि हवालदार (सीबीआयसी आणि सीबीएन) परीक्षा- 26 जून ते 24 जुलै 2025, 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
स्टेनोग्राफर ग्रेड ’क’ आणि ’ड’ परीक्षा- 5 ते 26 जून 2025, 6 ते 11 ऑगस्ट 2025
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत) परीक्षा 30 जून ते 21 जुलै 2025, 27 ते 31 ऑक्टोबर 2025
संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा - 5 जून ते 26 जुलै 2025, 12 ऑगस्ट 2025
हेड कॉन्स्टेबल (मंत्रालयीन) दिल्ली पोलिस परीक्षा 2025 जुलै/ सप्टेंबर 2025 नोव्हेंबर/ डिसेंबर 2025