Maharashtra FRA Inquiry: एफआरएच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी; सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त

शुल्क नियामक प्राधिकरणावरील तक्रारी आणि अनियमिततांची होणार चौकशी; तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
Law
LawPudhari
Published on
Updated on

पुणे: उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील शुल्क नियामक प्राधिकरण अर्थात एफआरएच्या संदर्भातील तक्रारी, अनियमिततांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

Law
Maharashtra School Timing Change: मतदारयादी पुनरीक्षणासाठी शाळांच्या वेळेत बदल; ३० जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात वर्गांचे निर्देश

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश शिंदे यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेवरील चर्चेत शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष हे सेवानिवृत्त न्यायाधीश असल्याने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नियुक्त करून प्राधिकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिले होते.

Law
Maharashtra School Bandh: 'शाळा बंद' आंदोलनावर सरकारचा इशारा; शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कपात

त्यानुसार शुल्क नियामक प्राधिकरणासंदर्भातील तक्रारी, अनियमिततांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती कालिदास वडाणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये तंत्रशिक्षण संचालक, मुंबई विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news