Maharashtra School Bandh: 'शाळा बंद' आंदोलनावर सरकारचा इशारा; शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कपात

टीईटी, बीएलओ कामे आणि पदोन्नतीच्या मुद्द्यावर आज राज्यव्यापी आंदोलन; शिक्षण संचालकांचे सर्व शाळा सुरू ठेवण्याचे आदेश
Teachers Protest
Teachers ProtestPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात गुरुवारी (दि. ९ जुलै) अनेक संघटनांनी 'शाळा बंद' आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना कोणतीही शाळा बंद राहू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच, शाळा बंद ठेवल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापणार आहेत.

Teachers Protest
Pune Landslide Prone Villages: पाटण दरड दुर्घटनेनंतर पुण्यातील ७२ दरडप्रवण गावांचा प्रश्न ऐरणीवर; केवळ २२ गावांतच कामांना सुरुवात

कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रियेतील अटी, संचमान्यता धोरण आणि (बीएलओ) कामाच्या सक्तीविरोधात गुरुवारी राज्यव्यापी 'शाळा बंद' आंदोलन करण्यात येणार आहे.

Teachers Protest
Pune Water Logging Spots: पुण्यातील ३९ पाणी साचणाऱ्या ठिकाणांसाठी कडक निर्देश; प्रत्येक स्पॉटसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त होणार

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण सीनिअर शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आणि इतर शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत.

Teachers Protest
SPPU NSS Swachh Wari: ‘स्वच्छ वारी-हरित वारी’ अभियानाला प्रारंभ; पुणे विद्यापीठाच्या एनएसएसची राज्यस्तरीय दिंडी सज्ज

मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन, तर राज्यभर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news