

शिवाजी शिंदे
पुणे: जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी करावी लागणारी कार्यालयीन धावपळ आता थांबणार आहे. राज्य शासनाकडून टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस (टीसीएस) या कंपनीच्या सहकायनि जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अद्ययावत, पूर्णपणे 'पेपरलेस' संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे अर्जदारांना ऑनलाईन अर्ज केलानंतर संबंधित जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाऊन अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
त्यामुळे विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार आणि इतर अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही अनेकदा अर्जदारांना संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करावी लागतात. अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यामुळे वेळ आणि पैसा खर्च होण्याबरोबरच शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो.
नव्या प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. शंका असल्यास ऑनलाईन सुनावणी जात पडताळणी समितीला अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत किंवा जातीच्या पुराव्याबाबत काही शंका असल्यास संबंधित अर्जदाराशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला जाणार आहे. या माध्यमातून ऑनलाईन चर्चा आणि सुनावणी घेऊन अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले आईल. त्यानंतर सादर केलेले पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीकडून गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल.
सुनावणीसाठी तीन पर्याय जात पडताळणीच्या कागदपत्राबाबत सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये जात पडताळणी समितीकडून अर्जदाराला तीन तारखा दिल्या जाणार आहेत. त्यापैकी सोयीची तारीख निवडून अर्जदाराला ऑनलाईन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, अर्ज सादर केल्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रक्रिया कोणाया टप्प्यावर आहे, वाचे ऑनलाईन ट्रेकिंग करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांचा (कास्ट सर्टिफिकेट) डिजिटल डेटा टीसीएसच्या नव्या प्रणालीशी ओडण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराने सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध करून घेणे आणि पडताळणीच्या वेळी संबंधित नोंदी तपासणे अधिक सोपे होणार आहे
सध्याची पद्धत
ऑनलाईन अर्ज आणि कागदपत्रे सादर करणे,
आवश्यकतेनुसार कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन हार्ड कॉपी जमा करणे.
अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी वारंवार फेऱ्या मारणे.
सुनावणीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता.
नव्या प्रणालीतील बदल
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पेपरलेस.
कागदपत्रांच्या हार्ड कॉपी जमा करण्याची गरज नाही.
आवश्यकतेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी.
सुनावणीसाठी तीन तारखांपैकी सोचीची तारीख निवडण्याची सुविधा.
अर्जाच्या स्थितीचे ऑनलाईन ट्रॅकिंग,