

पुणे : पद्धतीला फाटा देत राज्य परीक्षा परिषद आता ऑनलाइन परीक्षा आणि ऑनलाइन निकालावरच भर देणार आहे. त्याचबरोबर परीक्षा आणि निकालात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यातूनच परीक्षा परिषद कात टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
राज्य परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टायपिंग परीक्षा - 50 आणि 60, ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन करण्यात आली आहे. 30 ते 60 ही प्रत्येक टायपिंग परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्याना डिजिटल प्रमाणपत्राचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत डिजिटल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
टायपिंग परीक्षेसाठी एलएमएस सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याना लेक्चर, परीक्षा डेमो देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्याला आळा बसेल. या सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची हजेरीदेखील घेण्यात येणार असल्यामुळे बोगसगिरीला आळा बसणार आहे.
परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही आणि बायोमेट्रिक आता बंधनकारक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर होत असलेल्या गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. परीक्षा परिषदेकडे नोंद असलेल्या 3 हजार संस्थांपैकी 2 हजार संस्थांनी संबंधित निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. उर्वरित संस्था जोपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत.
तोपर्यंत त्यांना परीक्षाच घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विविध संस्थांचे नूतनीकरण पूर्वी ऑफलाइन करण्यात येत होते ते देखील आता ऑनलाइन करण्यात येत आहे. यामाध्यमातून 2200 संस्थांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सारथी, अमृत, बार्टी, आर्टी यांसह अन्य संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना देऊन मोफत टायपिंग परीक्षा शिकवण्याचा निर्णय घेतला असल्याचेदेखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षांसह निकालही ऑनलाईनपरीक्षा घेण्यावर भर
राज्य परीक्षा परिषद लवकरच केंद्रप्रमुख पदाची परीक्षा घेणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. तर नापास विद्यार्थ्याना टायपिंगचीदेखील पुन्हा परीक्षा देता येणार आहे. तसेच राज्य शासनाच्या आठ ते दहा विभागांच्या लघुलेखनाची परीक्षा घेण्यात आली आहे.
काय होणार सुधारणा
परीक्षांची प्रमाणपत्रे आता डिजीलॉकरवर होणार उपलब्ध
आधार प्रामाणिकरण केले जाणार यामुळे बोगस परीक्षार्थी पूर्ण बंद होणार
संस्था चालकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी क्यूरी मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात येणार
राज्य परीक्षा परिषद आता शतप्रतीशत ऑनलाइन कारभार करण्यावर भर देणार आहे. त्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. यातून परीक्षांच्या कामकाजाला गती मिळण्याबरोबरच पारदर्शकतादेखील येणार आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद