Maharashtra Vehicle Sales: कार विक्रीत महाराष्ट्र अव्वल

सियाम: आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सर्वच श्रेणींत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये
Maharashtra Vehicle Sales
Maharashtra Vehicle SalesPudhari
Published on
Updated on

पुणे: आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 5.61 लाख कारची आणि 1.62 लाख अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री करत महाराष्ट्राने देशात पहिले स्थान संपादन केले आहे, तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत पहिल्या तीनमध्ये महाराष्ट्र आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत देशात 46.43 लाख कारची विक्री झाली.

Maharashtra Vehicle Sales
Maharashtra Weather Update: विदर्भातील ब्रह्मपुरी 47.1 अंशांवर; उष्णतेची लाट 27 मेपर्यंत राहणार

महाराष्ट्राने 5.61 लाख कारची विक्री करत एकूण विक्रीतील 12.1 टक्के वाटा संपादन केले आहे. उत्तर प्रदेशाने 4.92 लाख कारची विक्री करत 10.6 टक्के वाटा संपादन करत दुसरे स्थान संपादन केले आहे, तर गुजरातमध्ये 3.71 लाख कारची विक्री झाली असून, त्यांनी 8 टक्के वाटा संपादन केला आहे. खालोखाल कर्नाटक (7.1 टक्के) आणि तामिळनाडू (6.8 टक्के) क्रमांक येतो.

गत आर्थिक वर्षात देशभरात 2 कोटी 17 लाख 10 हजार दुचाकींची विक्री झाली. उत्तर प्रदेशमध्ये 31.91 लाख दुचाकींची विक्री झाली असून, एकूण विक्रीतील 14.7 टक्के वाटा त्यांनी संपादन केला आहे.

Maharashtra Vehicle Sales
NEET Paper Leak Case: लातूरमधील डॉ. मनोज शिरुरेंची सीबीआयकडून सखोल चौकशी

महाराष्ट्राने 24.53 लाख दुचाकींची विक्री करीत, एकूण विक्रीतील 11.3 टक्के वाटा मिळविला आहे. तामिळनाडूमध्ये 17.58 लाख दुचाकींची विक्री झाली असून, एकूण विक्रीतील 8.1 टक्के वाटा संपादन केला आहे. खालोखाल गुजरात (7.2 टक्के) आणि कर्नाटक (6.3 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.

देशात 8.36 लाख तीनचाकी वाहनांची विक्री झाली असून, त्यातील 96 हजार 648 वाहने उत्तर प्रदेशात विकल्या गेली आहेत. एकूण विक्रीतील 11.8 टक्के वाटा एकट्या उत्तर प्रदेशचा आहे. खालोखाल गुजरातने 89 हजार 452 तीनचाकींची विक्री करत 10.7 टक्के वाटा संपादन केला आहे. महाराष्ट्राने 88 हजार 616 तीनचाकींची विक्री करत, एकूण विक्रीतील 10.6 टक्के वाटा मिळवला आहे. खालोखाल कर्नाटक (8 टक्के) आणि बिहार (6.9 टक्के)चा क्रमांक लागतो.

व्यावसायिक वाहन विक्रीतील 15 टक्के वाटा राज्याचा

अवजड मालवाहतूक वाहने, प्रवासी बस यांसारख्या 10.80 लाख व्यावसायिक वाहनांची देशात विक्री झाली. महाराष्ट्राने 1.62 लाख वाहनांची विक्री करत 15 टक्के वाटा संपादन केला आहे. गुजरातमध्ये 92 हजार 880 वाहनांची विक्री झाली असून, 8.6 टक्के वाटा संपादन केला आहे. तमिळनाडूमध्ये 90 हजार 720 वाहनांची विक्री झाली असून, 8.4 टक्के वाटा संपादन केला आहे. उत्तर प्रदेशने 8.3 टक्के आणि कर्नाटकने एकूण विक्रीतील 7.1 टक्के वाटा संपादन केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news