

पुणे: मान्सून वेगाने भारताकडे येत असताना अवघा देश भयंकर उष्ण लाटांनी होरपळून निघत आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील बांदा 48, तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 47.1 अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मान्सूनची अरबी समुद्रात प्रगती सुरू असून, तो सध्या श्रीलंकेत मुक्कामी आहे.
देशाच्या सर्वच भागांत सध्या उष्णतेची लाट प्रखर झाली असून, ती 27 मेपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद झाली.
तर, महाराष्ट्रात विदर्भातील ब्रह्मपुरीत 47.1 अंश तापमान नोंदले गेले. एकीकडे उष्णतेची लाट सुरू असताना मान्सूनदेखील जोरदार प्रगती करत आहे. मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रगती केली. सध्या तो तीन दिवसांपासून श्रीलंका देशात मुक्कामी आहे. केरळममध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. तोपर्यंत देशात सर्वत्र उष्ण झळा सुरू राहणार आहेत.
गुरुवारचे तापमान : ब्रह्मपुरी 47.1, वर्धा 46.4, चंद्रपूर 46.2, नागपूर 46.6, अकोला 45.2, अमरावती 46.4, यवतमाळ 45.2, गोंदिया 44.9, पुणे 38.2, लोहगाव 40, अहिल्यानगर 38.8, जळगाव 42.1, कोल्हापूर 35.7, महाबळेश्वर 29.6, मालेगाव 41.6, नाशिक 36.2, सांगली 37, सातारा 36.2, सोलापूर 38.6, धाराशिव 39.1, छत्रपती संभाजीनगर 41.6, परभणी 43, बीड 40.4, मुंबई 34.4.