
Ajit Pawar statement on dhirubhai ambani
पुणे : अजित पवार यांचे धीरुभाई अंबानींविषयीचे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून अजित पवारांना घेरले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजितदादा नेमके काय म्हणाले हे स्पष्ट केले आहे. 'पंपावरचे पेट्रोल सोडून धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले. पेट्रोलचा पंप चारचाकीमध्ये सोडून नोकरी करणे असा त्यांचा म्हणण्याचा आशय होता', असं स्पष्ट करत अमोल मिटकरींनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार यांनी रविवारी सभा घेतली.. 'मला सहकार टिकायचे नसते तर पंप काढले असता का? गोरगरिबांची मुलं तिथं कामाला लागली. मुले पंपावर कामावर लागणं हे माझ्यासाठी कमीपणाचं नाही. कुठलेही काम करणं कमीपणाचं वाटू घेऊ नका. जे पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यातून आपण सोनं निर्माण करु', असे अजित पवार यांनी म्हटले होते.
राज्यातील २०० कारखाने अडचणीतून चाललेत. त्यात १०० खासगी आणि १०० सहकारी आहेत. उंटावरुन शेळ्या राखून काम होत नाही. जीव ओतून काम करावं लागतं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. याच दरम्यान त्यांनी धीरुभाई अंबानींचा दाखला दिला. पंपावर पेट्रोल सोडूनच धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले, असे उदाहरण त्यांनी दिले.
अंजली दमानियांनी पोस्ट केला होता व्हिडिओ
अजित पवार यांनी धीरुभाई अंबांनी यांच्यावर केलेल्या वक्व्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X वर पोस्ट केली आहे. 'पंपावर पेट्रोल चोरून कोर्याधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, MSCB घोटाळा करून आपण काय केलंत?, असा सवाल दमानिया यांनी केला होता.
तर विरोधी पक्षांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही हे विधान पोस्ट केले जात होते. यावरून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला जात होता. यावर आता अमोल मितकरींनी उत्तर दिलं आहे.
अमोल मितकरी X (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट म्हणतात, सोडून ऐवजी चोरून हा शब्द तुम्हाला ऐकायला येतोय. पेट्रोल सोडून म्हणजे पेट्रोलचा पंप चारचाकीमध्ये सोडून नोकरी करणे असा " इतकेही समजून घेण्याचे औदार्य नाहीये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
अजित पवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे काय होते?
'उगीच घोळून घोळून बोलायचं, आपलं सोनं नाणं...'
वाडवडिलांचे सोनं- नाणं मोडलं आणि कारखाना उभा केला, असे सांगितले जाते. खासगी कारखाने उभे करण्याची माझी मानसिकता नव्हती. विलासराव देशमुखांनी खासगी कारखाने देणार, सहकारी बंद असे सांगितले. राज्याच्या प्रमुखांनी तो निर्णय घेतला. यामुळे दौंडच्या जगदाळे यांचा कारखाना होईना. आम्ही आमचे कारखाने स्वतः चालवतो. उगीच प्रत्येकवेळी घोळून घोळून बोलायचं, आपलं सोनं नाणं...सहकारी कारखाने मोडून काढतील. खासगीकारण करतील. खोटं बोलायचं रेटून बोलायचं. काहीही खोटं नाट सांगताय, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
मी 'ब' गटातून फॉर्म भरलाय; तुमच्या पोटात का दुखतंय?
बारामतीतील माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी 'ब' गटातून फॉर्म भरला आहे. कारखान्याचा चेअरमन आपण होणार असल्याची घोषणा स्वतः अजित पवार यांनी केली आहे. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर त्यांनी बोलताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फॉर्म भरावा लागला. तुमच्या पोटात का दुखतंय?. मी फॉम भरला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायदा संविधान दिले. त्याला अनुसरून मी फॉर्म भरला. जर हिंमत होती तर आक्षेप घ्यायचा होता. त्यात माझी काय चूक?. मी 'ब' वर्गाचा प्रतिनिधी आहे, असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही वडीलधारी म्हणून आशीर्वाद मागितले...
हे काय सांगतात खासदार, आमदारकीला बोलावून न्यायचे, तेव्हा वयाची अडचण नव्हती. तुम्ही वडीलधारी म्हणून आशीर्वाद मागितले. त्यात वयाची अडचण काय? निवडणुकीत उभे राहिल्यावर आम्ही कुणाचाही दारात जाऊ, शेवटी आम्ही उमेदवार आहोत. आम्ही विरोधकांना आणि जवळच्या नमस्कार करणार. कारण त्यांचे मत आम्हाला पाहिजे. त्यांनी दिले तर दुधात साखर. नाही दिले तर चांगभलं! अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल का? कोण पाणी ओततंय...? त्या ताटात जास्त अन्न टाकायची धमक या अजित पवारांमध्ये आहे, असे ते म्हणाले.