Sudhakar Badgujar joins BJP | ठाकरेंच्या सेनेला धक्का ? हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार

भाजपात प्रवेश न दिल्यास ते इतर पक्षात जाणारच; वरिष्ठांची भूमिका
Sudhakar Badgujar joins BJP
Sudhakar Badgujar joins BJPPudhari Photo
Published on
Updated on

Maharashtra politics update

नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे मंगळवारी (दि.१६) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बडगुजर यांच्यासोबतच, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले गणेश गीते यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेशाबाबत दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचे स्वागत करतो. शहराध्यक्ष यांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे.

सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक, ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख.

भाजपात प्रवेश न दिल्यास ते इतर पक्षात जाणारच; वरिष्ठांची भूमिका

विशेष म्हणजे बडगुजर आणि गीते यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पातळीवरील काही पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे समजते. मात्र, हा विरोध डावलून या दोघांनाही पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे नाशिक शहराध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारी सदस्य के. पी. चव्हाण यांनी विरोध करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याचीही माहिती समोर येत आहे. "आपल्याकडे पक्ष प्रवेश न दिल्यास ते इतर पक्षात जाणारच आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश देणे योग्य राहील," अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे समजते.

बडगुजर, गीते यांच्या पक्षप्रवेशाला विरोध कायम

या पार्श्वभूमीवर, सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी (दि.१७) निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, या पक्षप्रवेशाला भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे. आमदार हिरे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे आपला विरोध दर्शवला आहे. "सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाही," अशा आशयाचा मजकूर टाकत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांसमोर याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यास आमदार सीमा हिरे यांनी नकार दिला आहे.

नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार?

सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर ते राजकीयदृष्ट्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती. आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताने या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे कशी बदलतात आणि याचे भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जळगावला बैठक घेतली. बैठकीत त्यांनी सांगितले की, आपण जरी त्यांना पक्षात घेतले नाही, तरी ते इतर पक्षात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य आहे. स्थानिकांचा विरोध साहजिकच आहे. परंतु, वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला आहे की, स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर अडसर येणार नाही.

सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

गितेंच्या प्रवेशाला मुहूर्त?

बडगुजर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गिते यांचीदेखील भाजपमध्ये घरवापसीची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपने आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने गिते यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी केली होती. गिते यांचा पराभव आमदार ढिकले यांनी केला होता. त्यानंतर गिते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. शहराध्यक्ष केदार यांच्या वक्तव्यामुळे गिते यांच्या भाजप प्रवेशालाही मुहूर्त लागणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news