Maharashtra Cooperative Policy 2025: राज्याच्या सहकार धोरणासाठी सहा गटांची स्थापना; १५ दिवसांत अभिप्राय सादर करण्याचे आदेश

राष्ट्रीय सहकार धोरण 2025 अन्वये राज्य धोरण निश्चितीची प्रक्रिया सुरू; विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश
Cooperative Policy
Cooperative PolicyPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या सहकार धोरणासाठी सहा गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांना देण्यात आलेल्या विषयांवर त्यांचे अभिप्राय राज्याचे सहकार धोरण निश्चित करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी काढले आहेत. त्यामध्ये सहकाराचा पाया मजबूत करणे, सहकारी संस्थांना भविष्यासाठी सज्ज करणे या विषयावरील दोन गटांचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्याकडे देण्यात आले आहे.

Cooperative Policy
Maharashtra CET 2026 Registration Extension: एमसीए, एमएचएमसीटीसह बीएड-एमपीएड-एमएड सीईटी नोंदणीला मुदतवाढ

‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025 नुसार राज्याचे सहकार धोरण ठरविण्यासाठी शासनाने दिनांक 8 ऑक्टोबर 2025 अन्वये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 32 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली. या समितीच्या मुंबई येथे झालेल्या दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी बैठकीत ठरल्याप्रमाणे सहा धोरणात्मक ध्येय स्तंभांसाठी सहा गट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना नेमून दिलेल्या विषयांबाबत राज्यातील सहकारी संस्थांसंदर्भात संबंधीतांशी चर्चा करुन राज्याचे सहकार धोरणाबाबत अभिप्राय सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Cooperative Policy
Pune Flex Hoardings Controversy: मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना हरताळ; पुण्यात अभिनंदनाच्या नावाखाली फ्लेक्सबाजीचा धुमाकूळ

सहकाराचा पाया मजबूत करणे या ध्येय स्तंभासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेंचे प्रशासक विद्याधर अनास्कर हे गटप्रमुख आहेत. सदस्यांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते तर समन्वयक हे जिल्हा उपनिबंधक (ग््राामीण) प्रकाश जगताप हे आहेत. तसेच सहकारी संस्थांना भविष्यासाठी सज्ज करणे यासाठीही राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर हे गटप्रमुख आहेत. वैकुंठ मेहता संस्थेचे (वैमनिकॉम) संचालक सुवा कांता मोहंती, गोकुळचे संचालक चेतन नरके व दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड हे सदस्य असून पुणे शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत हे समन्वयक आहेत.

Cooperative Policy
Sinhagad Road Water Supply Project: सिंहगड रोड परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लागणार; महापालिकेचा चार कोटींचा आराखडा

सहकारात चैतन्यशीलता वाढवणे यासाठी सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे हे गटप्रमुख आहेत. सदस्यपदी अकोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, वस्त्रोद्योग आयुक्त तर समन्वयक हे नागपूर जिल्हा उपनिबंधक अजय कडू आहेत. सर्वसमावेशकता आणि सखोल पोहोच वाढवणे यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेंचे संचालक सतिश मराठे हे गटप्रमुख आहेत. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर, मत्स्य व्यवसाय आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे हे सदस्य तर समन्वयक हे ठाणे जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे आहेत.

Cooperative Policy
Parvati Navipeth Ward 27 corporator Lata Gowda: शिक्षण व महिला सबलीकरणाला प्राधान्य – लता गौडा यांचा संकल्प

नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्रवेश करणे यामध्ये सेवानिवृत्त सहकार आयुक्त मधुकर चौधरी हे गटप्रमुख आहेत. तर सदस्यपदी सहकारचे सेवानिवृत्त अपर आयुक्त दिनेश ओऊळकर, एस.बी. पाटील, डी.के.टी.ई. टेक्सटाईल इंजिनिअरिंग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य सी.डी. काणे हे असून समन्वयक म्हणून पुणे शहर उपनिबंधक (3) नागनाथ कंजेरी हे आहेत. सहकाराच्या विकास व वाढीसाठी तरुण पिढीला आकार देणे या ध्येय स्तंभासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन हे गटप्रमुख आहेत. तर सदस्यपदी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, पणन संचालक संजय कदम हे असून पुणे शहर उपनिबंधक (5) नारायण आघाव हे समन्वयक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news