Sinhagad Road Water Supply Project: सिंहगड रोड परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लागणार; महापालिकेचा चार कोटींचा आराखडा

नऱ्हेगाव, वडगाव व धायरीसाठी नवीन लाईन, पंपिंग स्टेशन व समान दाबाने पाणीपुरवठ्याचा निर्णय
Water
WaterPudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रोड परिसरातील नऱ्हेगाव, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द आणि धायरी येथील नागरिकांचा पाणीप्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने ठोस पावले पडू लागली आहेत. कमी दाब, अनियमित पुरवठा आणि टँकरवर अवलंबित्व या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने व्यापक आराखडा तयार केला असून, आवश्यक कामांसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेला लवकरच गती मिळणार आहे.

Water
Parvati Navipeth Ward 27 corporator Lata Gowda: शिक्षण व महिला सबलीकरणाला प्राधान्य – लता गौडा यांचा संकल्प

पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग (स्वारगेट) आणि प्रभाग क्रमांक 34 मधील लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक सिंहगड रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात पार पडली. सहाय्यक आयुक्त विजयकुमार वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका जयश्री भूमकर, नगरसेविका कोमल नवले उपस्थित होते. एल अँड टी कंपनीतर्फे अंकुश बोंद्रे व विकी महाले यांची उपस्थिती होती. तसेच प्रभागातील सर्व वॉलमननाही बोलावून पाणीपुरवठा नियमित व समान दाबाने होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Water
Pune Municipal Election Analysis: विमाननगर–वाघोली प्रभागात भाजपचा शतप्रतिशत विजय; राष्ट्रवादीला धोबीपछाड

या भागात समान व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. विशेषतः वडगाव खुर्द परिसरातील राजयोग सोसायटी, मधुकोष सोसायटी, गावठाण भाग व मानस परिसरात कमी दाबाची समस्या गंभीर असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा लाईन टाकणे, विद्यमान यंत्रणा सक्षम करणे व नियोजनबद्ध पद्धतीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

Water
Pune Automated Testing Station RTO: पुणे आरटीओचे ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन सज्ज; आता फक्त फिट वाहनेच रस्त्यावर

धायरी हा नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला भाग असून सध्या तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 12 इंची जलवाहिनी टाकणे, स्वतंत्र पंपिंग स्टेशन उभारणे तसेच आवश्यक विद्युत लोड मंजूर करून घेणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तातडीची गरज व्यक्त करण्यात आली असून नगरसेवकांनी त्यास सकारात्मक पाठिंबा दर्शविला.

Water
Pune RTO AI Radar Enforcement: बेशिस्त वाहनचालकांवर आता एआय रडारची नजर; पुणे आरटीओकडे अत्याधुनिक गाड्यांचा ताफा

नगरसेवकांच्या माध्यमातून तीन कोटींचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय

नऱ्हेगाव या विस्तारित भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी तक्षशिला, दरोडेनगर आणि महाराजानगर येथील जलटाक्यांशी संबंधित लाईन सक्षम करणे, अतिरिक्त मोटर्स बसविणे, आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे तसेच पंपिंगचा कालावधी वाढविणे या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले. या सर्व कामांसाठी एकूण सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली असून तो नगरसेवकांच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news