Maharashtra CET 2026 Registration Extension: एमसीए, एमएचएमसीटीसह बीएड-एमपीएड-एमएड सीईटी नोंदणीला मुदतवाढ

राज्य सीईटी सेलचा निर्णय; 18 व 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी, परीक्षा मार्चमध्ये
MHT CET Form Fee Hike
MHT CET Form Fee HikePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ( एम. एचएमसीटी ) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी 7 जानेवारी ते 9 फेबुवारी 2026 पर्यंत होती. तर मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए ) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी 7 जानेवारी ते 10 फेबुवारी 2026 पर्यंत आहे. या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीस दिनांक 18 फेबुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सीईटीसेलने स्पष्ट केले आहे.

MHT CET Form Fee Hike
Pune Flex Hoardings Controversy: मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना हरताळ; पुण्यात अभिनंदनाच्या नावाखाली फ्लेक्सबाजीचा धुमाकूळ

एमसीए या अभ्यासक्रमास 31 हजार 961 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर एम. एचएमसीटी या अभ्यासक्रमास 40 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 30 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर एम. एचएमसीटी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 25 मार्च 2026 रोजी होणार आहे. मागील वर्षी एमसीए सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये 56 हजार 257 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर एम. एचएमसीटी सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

MHT CET Form Fee Hike
Supriya Sule |"माझं आणि दादाचं झालेलं बोलणं आम्‍हालाच माहिती, कोणाची उणिधुणी काढणार नाही" : सुप्रिया सुळे असं का म्‍हणाल्‍या?

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

MHT CET Form Fee Hike
Sinhagad Road Water Supply Project: सिंहगड रोड परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लागणार; महापालिकेचा चार कोटींचा आराखडा

बीएड, एमपीएड व एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीस 24 फेबुवारीपर्यंत मुदतवाढ

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बी. एड. (जनरल व स्पेशल ), बी.एड. (इएलइसीटी), मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड ) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या तिन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची मुदतवाढ 24 फेबुवारी 2026 पर्यंत करण्यात आली आहे. एमपीएड व एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी 5 जानेवारी ते 10 फेबुवारी 2026 पर्यंत होती.

MHT CET Form Fee Hike
Parvati Navipeth Ward 27 corporator Lata Gowda: शिक्षण व महिला सबलीकरणाला प्राधान्य – लता गौडा यांचा संकल्प

तर बी. एड. (जनरल व स्पेशल ), बी.एड. (इएलइसीटी) या अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी 8 जानेवारी ते 13 फेबुवारी 2026 पर्यंत आहे. आजपर्यंत एमपीएड या अभ्यासक्रमास 1994 व एमएड या अभ्यासक्रमास 2756 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 24 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर याची फिल्ड परीक्षा 25 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर एमएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 25 मार्च 2026 रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news