

पुणे : उत्तर भारताकडून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांचा प्रभाव किंचित कमी होण्यास मंगळवार पासून सुरुवात झाली आहे.बुधवार पासून त्याचा परिणाम अधिक जाणवेल.
त्यामुळे किमान तापमानात फारशी घट होणार नसली तरी थंडीचा कडाका मात्र कमी जाणवणार आहे.असे वातावरण आगामी आठवडा राहण्याची शक्यता आहे.
गेले पंधरा दिवस राज्यात बोचरे वारे वाहत आहे.त्यामुळे दिवसा उन्हात गेल्यावरच हायसे वाटत आहे.मात्र राज्यातील गारवाऱ्यांचा प्रभाव हळूवारपणे कमी होत आहे.त्यामुळे आगामी चार ते पाच दिवस कडाक्याच्या थंडीपासून सुटका मिळणार आहे.असा अंदाज हवामान शास्त्रज्ज्ञांनी दिला आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे हा परिणा दिसत आहे.
अहिल्यानगर ७.४, पुणे ८.१, कोल्हापूर १४.९, महाबळेश्वर १२.८, मालेगाव ८.४, नाशिक ९.२, सांगली १२.३, सोलापूर १३.६, मुंबई २०.५, धाराशिव ११, छ.संभाजीनगर १२, परभणी १२.१, बीड ९.६, अकोला १२, अमरावती ११, बुलडाणा १४, ब्रम्हपुरी १२, चंद्रपूर १२.५, गोंदिया ९, नागपूर ९.६, वाशिम ११, वर्धा १०.५, यवतमाळ १०.५