

पुणे : राज्याच्या किमान तापमानात किंचित वाढ होत असूनही रात्री अन् पहाटेचा गारवा सोसवेना अशीच सध्याची स्थिती आहे. गुरुवारी राज्यात अहिल्यानगर ८.५, पुणे ९.८ अंशांवर खाली आले होते. राज्यात १८ दिवसांपासून थंडीची लाट सक्रीय असून, गत दहा वर्षातील ही सर्वात मोठी थंडीची लाट समजली जात आहे.
गेल्या ४८ तासांत किमान तापानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तशी घटही होत आहे. मात्र रात्री ८ ते सकाळी ९ पर्यंत तब्बल १२ तास नागरिकांना गारठा सहन होईना असेच वातावरण तयार झाले.
अहिल्यानगर ८.५, पुणे ९.८, जळगाव १०, कोल्हापूर १४.६, महाबळेश्वर ११.४, मालेगाव ९.४, नाशिक ९.६, सांगली १२.७, सातारा ११.९, सोलापूर १५.१, छ.संभाजीनगर १०.६, परभणी ११.२, अकोला ११.५, अमरावती १२.४, बुलढाणा १३, ब्रम्हपुरी १२.५, चंद्रपूर १२.४, गोंदिया १०.५, नागपूर ११.२, वाशीम ११.४, वर्धा १०.९, यवतमाळ १०