Maharashtra Child Deaths: बालमृत्यू रोखण्यासाठी आता प्रत्येक मृत्यूचे सखोल अन्वेषण; पुण्यासह राज्यात समित्यांची स्थापना

उपचार मिळण्यास झालेला विलंब, आरोग्य सुविधांतील त्रुटी आणि वैद्यकीय अडथळ्यांचा शोध; अडीच वर्षांत ३४ हजार ३२५ बालकांचा मृत्यू
Child
ChildPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बालमृत्यूमागील नेमकी कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता मृत्यूच्या केवळ नोंदीवर न थांबता सखोल अन्वेषण करण्यावर भर देण्यात येत आहे. पुण्यासह राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जिल्हा, तालुका आणि वॉर्डस्तरापर्यंत समित्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटनेची कारणमीमांसा केली जाणार आहे. उपचार वेळेत मिळाले का, आरोग्यसुविधांमध्ये कोणती कमतरता राहिली, वैद्यकीय उपचारांच्या कोणत्या टप्प्यावर अडथळा निर्माण झाला, याचा तपास केला जाणार आहे.

Child
Pune HCMTR Land Acquisition: पुण्यात एचसीएमटीआर भूसंपादनाला पहिल्याच टप्प्यात ‘ब्रेक’; जमीनमालकांच्या विरोधामुळे मोजणी स्थगित

राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना, पोषण आहार योजना आणि बालआरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतानाही पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे सत्र थांबलेले नसल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले. महाराष्ट्रात २०२३ पासून सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत अडीच वर्षांच्या कालावधीत ३४ हजार ३२५ बालकांचा मृत्यू झाला आहे.

Child
Purandar Drought Compensation: पुरंदरच्या दुष्काळी मदतीत तांत्रिक अडथळे; ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांची कोंडी

जन्मावेळी श्वासावरोध, कुपोषण, जंतुसंसर्ग आणि न्यूमोनिया ही मृत्यूची प्रमुख कारणे ठरली आहेत. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या प्रगत शहरांतही बालमृत्यूची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्णय घेतला असून, याबाबत सोमवारी कार्यासन अधिकारी वैभव कोष्टी यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. यासाठी जिल्हास्तरीय ग्रामीण व शहरी माता व बालमृत्यू अन्वेषण कृती समिती तसेच तांत्रिक अन्वेषण समित्यांची रचना करण्यात आली आहे.

Child
Khed Revenue Officer Attack: मरकळमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; आरोपीच्या अटकेसाठी काम बंदचा इशारा

वैद्यकीय कारणमीमांसा अधिक तज्ज्ञाधारित व्हावी, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या प्रतिनिधींचाही सहभाग राहणार आहे. मृत्यूचे कारण समोर आल्यानंतर त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना निश्चित करणे हा या अन्वेषणाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पुण्यातील प्रत्येक बालमृत्यूमागील वैद्यकीय, आरोग्यसेवा आणि सामाजिक कारणांचा शोध घेणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Child
Shirur Crime: शिरूरमध्ये चुकीच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या; सुपारी हत्येचा उलगडा

पुण्यातून यंत्रणा कार्यान्वित

पुणे जिल्ह्यातील आरोग्यसेवा आयुक्तालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि महिला व बालविकास विभागाला या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. विशेषतः स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागांचाही या यंत्रणेत समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील बालमृत्यूंची आकडेवारी

  • २०२३-२४ १३,८१०

  • २०२४-२५ १२,४३८

  • २०२५-२६ (सप्टेंबर) ८,०७७

  • एकूण ३४,३२५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news