Maharashtra CET CAP Registration 2026: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CET Cell ने CAP नोंदणीची अंतिम तारीख वाढवली

महाराष्ट्र CET Cell कडून BBA, BMS, BBM, BCA, MBA (Integrated) आणि MCA (Integrated) अभ्यासक्रमांच्या CAP प्रवेश नोंदणीला 26 जुलैपर्यंत मुदतवाढ; तात्पुरती गुणवत्ता यादी 29 जुलैला जाहीर होणार
Registration
RegistrationPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (इंटिग्रेटेड), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाच्या नोंदणीस २६ जुलै २०२६ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

Registration
Pune NEET Paper Leak Protest: पुण्यात काँग्रेस, वंचित आणि भाजप आमनेसामने; NEET प्रकरणावर आंदोलन तीव्र

बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाच्या नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून, पहिली मुदतवाढ २० जुलै २०२६ पर्यंत दिली होती, तर आता दुसरी मुदतवाढ दिनांक २६ जुलै २०२६ पर्यंत दिली आहे.

Registration
PDCC Bank Bonds: पीडीसीसी बँकेला RBIची 650 कोटींच्या बॉण्ड उभारणीस मंजुरी; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

या अभ्यासक्रमास आजपर्यंत बीबीए, बीएमएस, बीबीएम व एमबीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाला ३२ हजार ७६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाला २१ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही अभ्यासक्रम मिळून ५४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली ४४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Registration
Kurkumbh MIDC Chemical Industry: कुरकुंभ एमआयडीसीत बोगस केमिकलचा खेळ? रासायनिक उद्योगांवर वाढले संशयाचे सावट

संबंधित अभ्यासक्रमांना आता पीसीएम तसेच पीसीबी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-पडताळणी' किंवा 'प्रत्यक्ष पडताळणी' या पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी, असे स्पष्ट केले आहे.

Registration
Shirur Leopard Attack: शिरूरमध्ये बिबट्याचा पुन्हा हल्ला; ५ वर्षीय मुलीचा मृत्यू, वन विभागाचे १३ पिंजरे, नागरिकांचा संताप

...असे आहे सुधारित वेळापत्रक

  • प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - ६ ते २६ जुलै

  • प्रवेशासाठीच्या अर्जाची पडताळणी व अर्जाची निश्चिती - ७ ते २७ जुलै

  • तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २९ जुलै

  • विद्यार्थ्यांच्या तक्रारी (असल्यास) सादर करणे- ३० जुलै ते १ ऑगस्ट

  • अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे- ३ ऑगस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news