

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे घेतल्या जाणाऱ्या बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी ), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए ), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम ), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग््रेाटेड) व एमसीए (इंटिग््रेाटेड) या सात अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा 62 हजार विद्यार्थ्यांनी दिली असून, 87.66 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी दोन दिवस दिनांक 28 व 29 एप्रिलला बॅचनुसार घेण्यात आली. या सात अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी 71 हजार 67 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 62 हजार 301 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला 87.66 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या सीईटी परीक्षेला एकूण 8 हजार 766 विद्यार्थी अनुपस्थित होते. राज्यातील 36 जिल्ह्यांतील 132 परीक्षा केंद्रांवर ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली.
पहिल्या दिवशी दोन सत्रांमध्ये 35 हजार 594 विद्यार्थ्यांपैकी 31 हजार 68 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पहिल्या दिवशी या सीईटी परीक्षेला एकूण 4 हजार 526 विद्यार्थी अनुपस्थित होते. पहिल्या दिवशी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतील 132 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी दोन सत्रांमध्ये 35 हजार 473 विद्यार्थ्यांपैकी 31 हजार 233 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी या सीईटी परीक्षेला एकूण 4 हजार 240 विद्यार्थी अनुपस्थित होते. दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतील 119 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.