Pune MSEDCL Wooden Badminton Court: महावितरणचे पुण्यात पहिले ‘वुडन बॅडमिंटन कोर्ट’ उद्घाटन

अपघातशून्य महावितरण व उत्कृष्ट ग्राहकसेवेवर भर; क्रीडाधोरण लवकरच जाहीर होणार
MSEDCL
MSEDCLPudhari
Published on
Updated on

पुणे: महावितरण कंपनीने आपल्याला समाजात मान-सन्मान आणि ओळख दिली आहे. आता आपणही कंपनीला उत्तम योगदान देण्याची वेळ आली आहे. जागतिक दर्जाची उत्कृष्ट ग््रााहकसेवा, थकबाकीमुक्ती आणि सुरक्षिततेचे नियम पाळून ‌‘अपघातशून्य महावितरण‌’ घडवणे हीच आपली प्राथमिकता आहे. असायला हवी, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.

MSEDCL
Pune Sub Registrar Office Issue: पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची दुरवस्था; २७ पैकी १९ पदे रिक्त

राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार व्हावेत, या हेतूने पुण्यातील रास्ता पेठ प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महावितरणमधील पहिले ‌‘वुडन बॅडमिंटन कोर्ट‌’ साकारण्यात आले आहे. पुणे येथे मुख्य अभियंता असताना राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेनुसार कोर्टचे काम सुरू झाले होते. या कोर्टचे उद्घाटक म्हणून संचालक राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य अभियंता सुनील काकडे, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, उपमहाव्यवस्थापक अभय चौधरी, डॉ. संतोष पाटणी यांचेसह परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

MSEDCL
Pune Open Drinking Public Areas: वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगरमध्ये ‘ओपन बार’; नागरिकांकडून कारवाईची मागणी

पवार म्हणाले, ‌‘समाजात आपल्याला मिळणारा मान-सन्मान हा कंपनीमुळेच आहे. त्यामुळे आपली प्राथमिकता कायम महावितरण असले पाहिजे. कर्मचारी कल्याणासाठी लागणाऱ्या बाबी पुरविण्याकरिता महावितरणचे वरिष्ठ प्रशासन कायम सकारात्मक आहे. कितीही स्पर्धा झाली तरी आपला ग््रााहक टिकून राहील यासाठी ग््रााहकसेवा सुधारण्यावर भर द्या.‌’ प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे म्हणाले, मीसुद्धा एक खेळाडू आहे. अशा प्रकारचे सुसज्य असे ‌‘वुडन कोर्ट‌’ उपलब्ध होणे ही पर्वणीच आहे. खेळाडूंनी त्याचे चीज करावे. त्याचे पावित्र्य राखावे. नियम पाळावेत, स्वच्छता ठेवावी, तर मुख्य अभियंता सुनील काकडे म्हणाले, कंपनीच्या क्रीडा स्पर्धांत पुणे परिमंडलाचे खेळाडू सरस ठरले आहेत. खेळांमुळेच कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा तत्परतेने पुरविण्यावर मी भर देत आहे.

MSEDCL
Pune Blackmail Extortion Arrest: पुण्यात अत्याचार, ब्लॅकमेल व खंडणी प्रकरणी दाम्पत्य अटकेत

सूत्रसंचालन भक्ती कुलकर्णी व प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी केले, तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय सुळे यांनी आभार मानले. याप्रसंगी बॅडमिंटनपटू भरत वशिष्ट, सुरेश जाधव यांच्यासह अजय जाधव, संगीता देशमुख व कुस्तीपटू दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

MSEDCL
Bombay High Court Child Custody Ruling: सहा वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांना नकार; आईकडेच राहणार संगोपन

महावितरणचे क्रीडाधोरण लवकरच

महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात. राष्ट्रीय पातळीवरही महावितरणचे अनेक खेळाडू चमकत आहेत. त्यांच्या सेवासुविधा वाढविणे व प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी स्वत:चे क्रीडाधोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले.

राज्यात महावितरणचे पहिलेच ‌‘बॅडमिंटन कोर्ट‌’

बॅडमिंटन तसा महागडा खेळ आहे. व्यावसायिक कोर्टवर सराव करायचा झाल्यास तासाला पैसे मोजावे लागतात. तसेच ते आपल्या वेळेत उपलब्ध होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन पवार यांनी महावितरणचे हक्काचे ‌‘वुडन बॅडमिंटन कोर्ट‌’ साकारण्याचा निर्णय घेतला. लवकरच या कोर्टवर मॅट टाकण्याचेही काम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news