तळेगाव आगारातून लांब पल्ल्याची बससेवा बंद

तळेगाव आगारातून लांब पल्ल्याची बससेवा बंद
Published on: 
Updated on: 

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे एसटी आगारातून लांब पल्ल्याच्या एसटी बस तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग दिवसेंदिवस तीव्र होत आहे. महामार्गावर जाळपोळ करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार घडत असल्यामुळे तळेगाव दाभाडे आगारातून तुळजापूर,सोलापूर,पंढरपूर,बीड,पाथर्डी,अक्कलकोट, आदी लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच तळेगाव दाभाडे येथे येणा-या लांबपल्लयाच्या गाड्याही बहूतांशी बंद झालेल्या आहेत. मावळातील स्थानिक बस गाड्यांच्या फे-या नेहमी प्रमाणे चालू आहेत. अशी माहीती तळेगाव दाभाडे येथील आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news