पुणे : एकनाथ खडसे यांनी पंधरा दिवसांची वाट न बघता आत्ताच भाजपमध्ये प्रवेश करावा आणि जाताना विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, अशी टीका माजी आमदार संतोष चौधरी यांनी केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी निश्चितीसाठी पुण्यात सोमवारी बैठक झाली.
त्या वेळी चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चौधरी म्हणाले, रावेर लढवण्यासाठी उमेदवारी मिळाल्यास जास्तीत जास्त फरकाने विजय होऊ, असा विश्वास संतोष चौधरी यांनी व्यक्त केला. जास्तीत जास्त सहानुभूती महाविकास आघाडीला आहे. सर्व जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा