स्टॉक एक्स्चेंजचे बाजार भांडवल पहिल्यांदाच 400 लाख कोटींवर | पुढारी

स्टॉक एक्स्चेंजचे बाजार भांडवल पहिल्यांदाच 400 लाख कोटींवर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स-निफ्टीने नवा इतिहास रचला. शेअर बाजारात जबरदस्त तेजी होती. बाजार भांडवलात तब्बल 1.55 लाख कोटींनी वाढ झाली.

सेन्सेक्सने 74,869 चा, तर निफ्टीने 22,797 चा उच्चांक गाठला. नंतर सेन्सेक्स 494 अंकांच्या वाढीसह 74,742 वर स्थिरावला. निफ्टीत 152 अंकांची वाढ होऊन तो 22,666 वर स्थिरावला. ऑईल, गॅस तसेच रिअल इस्टेटमध्ये एक टक्क्याची वाढ नोंदविली गेली.

बीएसई (मुंबई शेअर बाजार) बाजार भांडवलात 1.55 लाख कोटींनी वाढ होऊन ते 400 लाख कोटींच्या पुढे गेले. 5 एप्रिल रोजी हेच बाजार भांडवल 399.31 लाख कोटी होते. गेल्या 9 महिन्यांत बाजार भांडवलात जवळपास 100 लाख कोटींची वाढ झाली आहे.

हे समभाग तेजीत

मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.26 टक्क्यांनी वाढ झाली. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये 3.22 टक्यांनी वाढ झाली. एनटीपीसी 2.54 टक्के, जेएसडब्लू स्टील 2.39, लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स 1.92 टक्के अशी वाढ झाली. अ‍ॅक्सिस बँक, एलटी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल या सर्व शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांनी वाढ दिसून आली.

Back to top button