loksabha election : स्वाभिमानी पुणेकरांच्या हितासाठी..; आ. रवींद्र धंगेकरांच विधान चर्चेत

loksabha election : स्वाभिमानी पुणेकरांच्या हितासाठी..; आ. रवींद्र धंगेकरांच विधान चर्चेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी पुणेकरांच्या हितासाठी महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे आहेत. पुण्यातून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

तर भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोहोळ आणि धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अन्य कोणत्या पक्षाचे व आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. अर्ज भरण्यास आणखी तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी असल्याने प्रमुख उमेदवारांना त्यांची रणनीती ठरवण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकर म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, याबद्दल मी सर्व वरिष्ठांचा आभारी आहे. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. त्यामुळे याआधी मला पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे. आता याही निवडणुकीत पुणेकर मला आशीर्वाद देतील, याची खात्री आहे. भाजपच्या कारभाराला, फसवणुकीला जनता कंटाळली आहे. ती या निवडणुकीत भाजपला आपली जागा दाखवून देईल, याची आम्हाला गॅरंटी आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news