Lohgaon Airport Leopard Security: लोहगाव विमानतळावरील सर्व बोगदे जाळीबंद; बिबट्या घटनेनंतर सुरक्षेत मोठी वाढ

दुर्मीळ बिबट्या पकडीनंतर हवाई दल सतर्क; वन्यजीव प्रवेश रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
Airport Leopard Security
Airport Leopard SecurityPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे: लोहगाव विमानतळावरील सर्वच बोगदे आता जाळीबंद करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच त्या विस्तीर्ण परिसरात कोणत्याही बाजूने वन्यजीव आता जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी या परिसरात चोवीस तास सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Airport Leopard Security
Ajit Pawar Sharad Pawar NCP: शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता 60 ते 70 किलो वजनाचा नरबिबट्या विमानतळावर पकडण्यात आला. ही अलीकडच्या काळातील दुर्मीळ घटना आहे. कारण विमानतळ स्थापन झाल्यापासून अशा प्रकारची घटना इथे घडली नव्हती. 28 एप्रिलपासून बिबट्याचा वावर त्या भागात होता. मात्र विमानतळ सैन्यदलाच्या अखत्यारित असल्याने वन विभागाला थेट तेथे जाऊन कारवाई करणे कठीण झाले होते. बिबट्या हा विमानतळाच्या खालील बोगद्यात लपल्याने तब्बल 6 तासांची कारवाई करून बिबट्याला जेरबंद केल्यानर ही काळजी घेण्यात येत आहे.

Airport Leopard Security
Pune Municipal Election 2026: भाजप, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सज्ज

बोगद्यांना जाळ्या लावणार...

विमानतळ स्टेशनने आता भूमिगत बोगद्यांचे सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी लोखंडी जळ्यावजा दरवाजे बसवले आहेत. राहिलेल्या भागात ते काम युद्धपातळीवर सुरू केले जाणार आहे. यामुळे भविष्यात अशा वन्यजीवांना लपण्यासाठी सहज उपलब्ध होणार नाही.

तो चकवा देत होता...

विमानतळावरील बिबट्या सहा महिन्यांहून अधिक काळ हवाई दलाच्या जवानांना चकवा देत फिरत होता. त्याने बोगद्यातील कमी वर्दळीच्या भागांमध्ये प्रवेश केला होता. अंधार असलेल्या, अर्धवट उघड्या जागांचा वापर आपला लपण्याचा ठिकाणा म्हणूनच त्याने केला होता.

Airport Leopard Security
Pune Municipal Corporation Election 2026: भाजप, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमध्ये तिरंगी लढत

सुरक्षेत केली वाढ...

  • लोहेगाव येथील हवाई दल स्टेशनने भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून कडक सुरक्षा आणि वन्यजीव व्यवस्थापन उपाययोजना सुरू केल्या आहेत. बिबट्याला शुक्रवारी पहाटे पकडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला.

  • काय म्हणाले वनअधिकारी सुरेश वरक

  • या भागात पुन्हा दुसरा बिबट्या येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व प्रकारची दक्षता घेतली जात आहे.

  • एकदा एखादा प्राणी आपले क्षेत्र सोडतो, तेव्हा दुसरा प्राणी तेथे येतो.

  • आम्हाला स्टेशनवर पुन्हा अशी परिस्थिती पाहायची नाही. म्हणून आम्ही स्टेशन अधिकाऱ्यांना मोकळ्या जागेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे..

  • स्टेशन परिसरात भुयारांचे जाळे आहे. त्यामुळे, भविष्यात दुसऱ्या प्राण्याला पकडणे आव्हानात्मक ठरेल.

  • या भुयारांची दारे गरजेनुसारच उघडली पाहिजेत. तसेच त्यांची तपासणी केली पाहिजे, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.

Airport Leopard Security
Interstate Theft Gang Arrest: लोहमार्ग पोलिसांकडून आंतरराज्यीय चोरट्या टोळीचा पर्दाफाश

हवाई दलाने सुरू केली ही कामे...

  • ज्या भागात बिबट्याचा वावर होता तेथे चोवीस तास पहारा लावला आहे.

  • अडथळ्यांव्यतिरिक्त, हवाई दलाने आपल्या कार्यक्षेत्रात स्पष्ट दृश्यमानता राखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहे.

  • प्राण्यांना आकर्षित करू शकणारे उंच गवत आवरण काढून टाकण्याचे काम सुरू आहे.

  • विशेषतः धावपट्टी आणि टॅक्सी मार्गाजवळील गवत कापण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

  • विमानांना, वैमानिकांना प्राण्यांमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही कळजी घेतली जात आहे.

  • संपूर्ण परिसरात काटेरी तारांचे कुंपण घालून सीमा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

  • याचा उद्देश केवळ वन्य प्राणीच नव्हे, तर भटकी गुरे, कुत्रे किंवा अनधिकृत व्यक्तींनाही प्रवेश करण्यापासून रोखणे आहे.

  • विमानतळाच्या सभोवतालच्या भागातून कचरा आणि टाकाऊ पदार्थ वेळेवर हटवले जातील याची खात्री करण्यासाठी पुणे महानगरपालिकेशी नियमित समन्वय राखला जात आहे.

  • या सहकार्यामुळे मृतभक्षक प्राणी परिसराच्या जवळ येण्याची शक्यता कमी होण्यास मदत होईल.

  • सध्या विमानतळाच्या आवारात एकही भटका कुत्रा नाही.

  • विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगच्या वेळी त्यांची सुरक्षा राखण्यासाठी प्राणी-मुक्त वातावरण तयार केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news