

पुणे: महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याने तब्बल आठ वर्षांनंतर आता स्थानिक पातळीवर निवडणुकीचा सामना रंगणार आहे. भाजपची राष्ट्रवादीशी युती होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास आणि महाविकास आघाडी, अशी तिरंगी लढत रंगणार आहे. त्या तिरंगी लढतीतही ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग््रेास आणि महाविकास आघाडी’ अशीच लढत होईल, असेच चित्र आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड सह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका 2017 ला झाल्या होत्या. फेबुवारी 2022 मध्ये हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होणे अपेक्षित होते. इतर मागासवर्गाचे आरक्षण आणि प्रभागरचना यावरून न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे तब्बल तीन वर्षे महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर न्यायालयाने मे महिन्यात या सर्व याचिकांवर निकाल देताना 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रभागरचनेपासून आरक्षण सोडतीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
दरम्यान मागील तीन वर्षांत राज्यात बदललेली सत्तासमीकरणे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेली फूट यामुळे पुणे महापालिकेची राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. त्यामुळे 120 नगरसेवक निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या भाजपला पुण्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग््रेासचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे महापालिका निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप व राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले, तर काही ठिकाणी शिवसेनेसमवेत युती होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे भाजप व राष्ट्रवादी कॉंग््रेास यांच्यात सामना होणार हे चित्र स्पष्ट झाले. तर दुसरीकडे काँग््रेास, राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्याही पुण्यातील बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील भाजप, राष्ट्रवादी कॉंग््रेास आणि महाविकास आघाडी यांच्यातील तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
भाजप हाच राष्ट्रवादीसमवेत महाविकास आघाडीचा मुख्य विरोधक
2017 मध्ये महापालिकेतील काँग््रेास आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढत भाजपने विक्रमी 98 जागा जिंकत सत्ता मिळविली. त्यानंतर शहरात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही भाजपचेच वर्चस्व राहिले. आता महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग््रेास आणि महाविकास आघाडी यांचा सामना भाजपशी होणार असल्याचे स्पष्ट आहे. गत महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 98 जागा जिंकल्या होत्या, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग््रेासने 41, शिवसेना व काँग््रेासने प्रत्येकी 10, मनसेने 2 आणि एमआयएम 1 अशा पद्धतीचे संख्याबळ होते. आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपचा या सर्व पक्षांशी सामना असणार आहे.
राष्ट्रवादी व शिवसेना फुटीचा फायदा भाजपला?
राज्यात राष्ट्रवादी कांग््रेास आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. आता या दोन्ही पक्षाचे उमेदवार महापालिका निवडणुकीत पुन्हा एकमेकांच्या आमने-सामने येतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या मतदारांची विभाजणी होऊन त्याचा फायदा पुन्हा भाजपला होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपाची उत्सुकता
राष्ट्रवादी पवार पक्ष, काँग््रेास आणि शिवसेना ठाकरे गट यांची आघाडी निश्चित आहे. या तीनही पक्षात जागा वाटप कसे होणार याबाबत उत्सुकता आहे. प्रामुख्याने वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पवार गटाला अधिकाधिक जागा मिळतील अशी शक्यता आहे, तर पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ या मतदार संघातील काही भागात काँग््रेास आणि शिवसेना यांची ताकद आहे. त्यामुळे या मतदार संघात या दोन्ही पक्षांना जागा मिळतील अशी शक्यता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास एकत्र येणार का?
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग््रेास एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या विरोधामुळे या चर्चेला सध्या विराम मिळाला आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग््रेास आणि महाविकास आघाडी एकत्र येऊनही निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसेची भूमिकाही निर्णायक ठरणार
या महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. 2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2017 मध्ये मनसेचे फक्त 2 नगरसेवक निवडून आले. आता मनसे आणि शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत. परिणामी पुण्यातही हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांना फायदा होणार आहे. मात्र, मनसे महाविकास आघाडीत जाणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.