Local Body Election Pune: स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी

पुणे जिल्ह्यात महायुती आणि महाआघाडीसमोर आव्हान; पक्षवर्चस्व राखण्यासाठी तालुका नेत्यांना कष्टाचे दिवस
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटीPudhari
Published on
Updated on

सुहास जगताप

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील बड्या नेत्यांसह तालुक्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या नेत्यांचीही मोठी कसोटी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे, राहुल कुल या त्यांच्या पक्षाची मोठी जबाबदारी असलेल्या नेत्यांची जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी या वेळी चांगलीच कसोटी लागणार आहे.(Latest Pune News)

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
Mission Vatsalya Scheme Maharashtra: अनाथ बालके आणि विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’चा आधार; राज्यात अंमलबजावणी लवकरच

पुणे जिल्ह्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता महायुती किंवा महाआघाडी होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. एखाद्या वेळी महाआघाडी काही ठिकाणी होऊ शकेल; परंतु महायुतीतील तीनही पक्ष पुणे जिल्ह्यात एकत्रितपणे निवडणुका लढतील अशी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था सध्या दृष्टिक्षेपात दिसत नाही. पुणे जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्या-त्या पक्षांच्या बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांना यामुळे फार कष्ट घ्यावे लागणार आहेत.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
JICA Project Pune Mula Mutha River: जागा न मिळाल्याने जायका प्रकल्प रखडला; औंध जैवविविधता उद्यानाची जमीन पालिकेच्या ताब्यात नाही

सुमारे पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय काळानंतर या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा पायाच आहे. या निवडणुकीत जर पक्ष तळागाळात रुजला आणि स्थानिक पातळीवर पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य किंवा नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आले तर विधानसभा आणि लोकसभेला मोठी मदत होऊ शकते, त्यामुळे या निवडणुकांवर बड्या नेत्यांसह तालुकापातळीवरील नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
Mission Vatsalya Scheme Maharashtra: अनाथ बालके आणि विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’चा आधार; राज्यात अंमलबजावणी लवकरच

या वेळेला महायुतीतील प्रत्येक पक्षासमोर तिकीट वाटपाचे मोठे आव्हान असेल; कारण या ठिकाणावरून नाराज झालेल्या लोकांना सहजपणे महाआघाडीमध्ये तिकीट मिळू शकते; परंतु शरद पवारांनी नव्या उमेदीच्या युवकांना उमेदवारी देण्याचा मनोदय केला असल्याचे नुकतेच जाहीर झाल्याने महायुतीतून महाआघाडीत जाणाऱ्यांनाही सहजा सहजी तिथे उमेदवारी मिळेल, असे चित्र सध्यातरी दिसत नाही.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
Education Department Promotion Maharashtra: शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती; पुण्यातील आठ जणांचा समावेश

सध्या बड्या नेत्यांसह तालुकापातळीवर भोर-वेल्हा-मुळशीमध्ये विद्यमान आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग््रााम थोपटे, पुरंदर-हवेलीमध्ये विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे फायर बँड नेते विजय शिवतारे आणि नुकतेच काँग््रेासमधून भाजपवासी झालेले माजी आमदार संजय जगताप, बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये पारंपरिक विरोधक विद्यमान आमदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे-हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रवीण माने, तर दौंडमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात या पारंपरिक नेत्यांमध्ये तर शिरूरमध्ये विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके आणि माजी आमदार अशोक पवार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्यामध्ये आपल्या तालुक्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी मोठी काट्याची लढत होईल.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
Pune Rain: ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पावसाने झोडपले, भातपिकाचे मोठे नुकसान

जुन्नरमध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुलबेनके, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल तर आंबेगावमध्ये अगदी थोड्या मतांनी विधानसभेला पराभूत झालेले देवदत्त निकम आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शेठ शहा, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आपली सत्ता टिकविण्यासाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. या सर्व नेत्यांना आपल्या तालुक्यावर, आपल्या जिल्ह्यावर आपले वर्चस्व ठेवायचे असल्याने या सर्वांची या निवडणुकीमध्ये मोठी कसोटी लागेल. विशेषत: बारामती आणि संपूर्ण जिल्ह्यात शरद पवारांचे वर्चस्व राहणार की अजित पवारांचे वर्चस्व कायम राहणार, यावर मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय घडामोडींकडे मोठ्या उद्बोधकपणे पाहण्याची यापुढे गरज आहे. डाव-प्रतिडाव कसे खेळले जातात, यावर आणि या लढतीचे चित्र अवलंबून असेल तसेच सर्वव्यापी एखादा प्रश्न जर ऐन वेळेला निवडणुकीत निर्माण झाला तर त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाचाही निवडणुकीवर परिणाम होईल.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बड्या नेत्यांसह तालुका पातळीवरील नेत्यांचीही कसोटी
Pradhan Mantri Matru Vandana Yojana: ‘मातृवंदना’ योजनेने दिला महिलांच्या आरोग्याला नवा आधार

शेतकऱ्यांचा असंतोष पडणार कोणाच्या पथ्यावर?

अतिवृष्टी आणि इतर संकटांमुळे शेतकरी सध्या पूर्णपणे गाळात गेलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. या असंतोषाचे रूपांतर कशात होते आणि कोणता पक्ष या असंतोषाचा उपयोग करून घेतोय, हे पाहणेसुद्धा राजकारणाचे एक मोठे गणित ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news