पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Published on
Updated on

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : खामुंडी (ता. जुन्नर) हद्दीतील कल्याण- नगर महामार्गावर पाण्याच्या टाकीजवळ बोडके मळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी (दि. २९) पहाटे अंदाजे २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला.

याबाबत कैलास बोडके यांनी ओतूर वनविभागाला कळविल्यानंतर जुन्नरचे सहाय्यक वनरक्षक अमित भिसे, ओतूर वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक अतुल वाघोले, शौकत मोमीन, किसन खरोडे यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

रात्री भक्षाच्या शोधात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस कर्मचारी रामेश्वर आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, अनिल बोडके, कुणाल डुंबरे, विक्रम डुंबरे हे देखील वनविभागाच्या मदतीसाठी उपस्थित झाले होते.

हा मृत बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचा नर असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उदापूर येथील रोपवाटिका केंद्रात डॉ. निखिल बनगर आणी पशुविद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत डुंबरे यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यावर अंत्यसंस्कार देखील केले असल्याची माहिती वनरक्षक सुधाकर गिते यांनी दिली आहे.

दरम्यान रात्रीच्या वेळी वाहन चालवीताना वन्यजिवांची काळजी घेऊन वाहन चालविण्याचे आवाहन ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी वाहन चालकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news