परिंचे : वीर धरणाची पातळी खालावली

परिंचे : वीर धरणाची पातळी खालावली

परिंचे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्याचे बारा दिवस झाले तरी पावसाने पाठ फिरविल्याने वीर धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीर धरणाची पाणीपातळी प्रमाणापेक्षा जास्त खालावली आहे. सध्या धरणात एकवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, असे धरण प्रशासनाने सांगितले. नीरा नदीच्या खोर्‍यात येणार्‍या वीर, भाटघर, निरा, देवघर व गुंजवणी धरणांतील पाणीसाठा 23 टक्के आहे. या धरणामध्ये 11 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा होता. वीरधरणाच्या पाण्याने 2019 नंतर पहिल्यांदाच तळ गाठला आहे.

धरणात बुधवारी 21 टक्के म्हणजे 2.40 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 47 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. भाटघर धरणात 22.35 टक्के म्हणजेच 5.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 31 टक्के म्हणजे 7.46 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. निरा देवघर धरणात 25 टक्के पाणीसाठा म्हणजे 3.15 टीएमसी पाणी आहे. गेल्या वर्षी या दिवशी 23 टक्के पाणीसाठा होता.

गुंजवणी धरणात 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 41 टक्के पाणीसाठा होता. चारही धरणांत मिळून 35 टक्के पाणीसाठा निरा नदीमध्ये शिल्लक होता, असे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. वीर धरणावर पुणे, सातारा व सोलापूर जिल्हे अवलंबून आहेत. धरण साखळी क्षेत्रातील गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिल्यास यावर्षी धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे, असे धरण प्रशासनातील शाखा अधिकारी लक्ष्मण सुद्रिक यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news