Leopard Terror: सिंहगड भागात बिबट्यांची दहशत; भरदिवसा बिबट्यांचे दर्शन

सुरक्षेसाठी वन विभागाने मुख्य पानशेत रस्त्यासह परिसरात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी
Leopard Terror
सिंहगड भागात बिबट्यांची दहशत Pudhari
Published on
Updated on

वेल्हे: पुणे-पानशेत रस्त्यासह सिंहगड, पानशेत भागात वारंवार बिबटे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. भरदिवसा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने या परिसरात दहशत पसरली आहे. परिणामी, येथील स्थानिकांसह पर्यटकांनाही धोका निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात.

त्यामुळे सुरक्षेसाठी वन विभागाने मुख्य पानशेत रस्त्यासह परिसरात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी यांनी वन विभागाचे लक्ष वेधले आहे.  (Latest Pune News)

Leopard Terror
Pune Feeder Points: फीडर पॉइंट्सला मिळणार नवा चेहरा; स्वच्छतेबाबत आयुक्त ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर

जोरी म्हणाले की, सिंहगड किल्ल्याच्या डोंगररांगांतून व खडकवासला धरणतीरावरून जाणार्‍या पानशेत रस्त्यावर मोठी वर्दळ असते. खानापूर ते पानशेत यादरम्यानचा रस्ता जंगलातून जातो. या भागात बिबट्यांचे लपणक्षेत्र आहे. त्यामुळे खाद्य किंवा पाण्यासाठी बिबट्यांसह वन्यप्राणी रस्त्याच्या बाजूला फिरतात. बिबटे, तरस असे प्राणी थेट खासगी कंपन्या, फार्म हाऊस, जनावरांच्या गोठ्यात शिरण्याचे यापूर्वी प्रकार घडले आहेत. त्यामुळे या परिसरात या प्राण्यांची मोठी भीती आहे.

पानशेत रस्त्यावरील मालखेड (ता. हवेली) येथील एका खासगी कंपनीत बिबट्याने गेल्या आठवड्यात ठाण मांडले होते. त्या वेळी कंपनीच्या वॉचमनसह कामगारांची मोठी धावाधाव झाली होती. सिंहगड पायथ्याच्या थोपटेवाडी, काळुबाई मंदिर भागातील जंगलात दोन बिबट्यांचा वावर आहे. कुत्री, वासरे अशा जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. दरम्यान, सिंहगड वन विभागाने मालखेड, सिंहगड भागातील कंपन्या, गावोगाव जनजागृती सुरू केली आहे.

Leopard Terror
Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी

वन विभागाची गस्त सुरू

पानशेत, रुळे, धिंडली भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पानशेत वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी स्मिता अर्जुने, वनरक्षक राजेंद्र निंबोरे यांच्या पथकाने गस्त सुरू केली आहे.

मालखेड येथील खासगी कंपनीतील कामगार तसेच स्थानिक नागरिकांना सतर्कतेबाबत सूचना दिल्या आहेत. बिबट्या जादा काळ एका ठिकाणी थांबत नाही. सिंहगडच्या वनक्षेत्रात बिबट्यांसह इतर वन्यजीवांचा अधिवास आहे. वन विभागाचे वनरक्षक आणि कर्मचारी जनजागृती करीत आहेत.

- समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news